पुणे : आय मिरर
पिंपरी चिंचवड शहरातील बाल कलाकार आकांक्षा पिंगळेला यंदाच्या सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते हा पुरस्कार तिला देण्यात आला.आकांक्षाने सुमी चित्रपटात केलेल्या सुमीच्या भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे. आकांक्षा च्या ह्या यशाने पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानचा तुरा रोवला गेलाय.
आकांशा हिला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तिचा विविध स्तरावरून सन्मान करण्यात आला. पिंपरी चिंचवड मधील सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते तसेच नातेवाईक यांच्याकडून तिचा सन्मान करण्यात आला. शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील तिचे कौतुक केले. राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेली आकांक्षा पिंगळे ही पिंपरी चिंचवड मधील एकमेव असल्याने संपूर्ण पिंपरी चिंचवड नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात तिचं कौतुक होताना दिसत आहे.
आकांक्षा पिंगळे ही सर्वसाधारण कुटुंबातील आहे.तिचे वडील आपला उदार निर्वाह करण्यासाठी पिंपरी चिंचवड मध्ये स्थायिक झाले.ते एका कंपनीमध्ये काम करतात. ज्यावेळेस दिल्ली येथे आकांक्षा पिंगळे हिला हा पुरस्कार दिला जात होता त्यावेळेस तिचे वडील तिच्यासोबत होते त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून सुखाचे अश्रू अनावर झाले.