इंदापूर : आय मिरर
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कांदलगाव मध्ये रानगव्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. गेल्या आठ महिन्यांपासून या ठिकाणी रानगाव्यांचा वावर असून आता हे रानगवे पाळीव जनावरांवर हल्ले करू लागलेत. शेतकऱ्यांची जनावरे हल्ल्यात जखमी होत असल्याने इंदापूर वन विभागाने तात्काळ या रानगव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सोमवारी रात्री कांदलगांव मधील लक्ष्मण काशीद यांच्या शेतात या रानगव्याने जनावरांवर हल्ला केला.यामध्ये त्यांची काही जनावरे जखमी झाली आहेत.यानंतर गणेश लक्ष्मण काशीद यांनी इंदापूर वनविभागाकडे लेखी तक्रार केली असून वनगव्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.