“आमदार दत्तात्रेय भरणे यांनी शेती विकास महामंडळाच्या संदर्भात ज्या मागण्या केल्या आहेत. या मागण्यांची दखल महसूल मंत्री यांनी घेतली असून, लवकरच एकत्रित बैठक घेऊन मार्ग काढला जाईल असा शब्द महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात दिला.”
इंदापूर : आय मिरर
इंदापूरसह राज्यात पुणे, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा व औरंगाबाद या सात जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र शेती महामंडळाच्या एकूण १४ मळयावर हजारो कामगारांपैकी ८० टक्के कामगार अनुसूचित जाती/जमाती, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असून त्यांना घर बांधणीसाठी राज्य सरकारने शेती महामंडळाच्या कामगारांना हक्काच्या घरांसह दोन गुंठे जागा उपलब्ध करुन द्यावी.शिवाय खंडकरी शेतकरी बांधवांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी अशी मागणी इंदापूरचे आमदार माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हिवाळी अधिवेशनात केली.लक्षवेधी तासाला आमदार भरणे यांनी राज्यातील या महत्वाच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधल्याने सरकारकडून तात्काळ याची दखल घेत हा प्रश्न लवकरचं मार्गी लावला जाईल असे आश्वासन म्हसुलमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याने गेले अनेक वर्षाचा प्रलंबीत असणारा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.
नागरपूर या ठिकाणी सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे.सोमवारी २६ डिसेंबर रोजी आमदार भरणे यांनी लक्षवेधी मध्ये शेती महामंडळाच्या कामगारांचे तसेच खंडकरी शेतकरी बांधवांचे विविध प्रश्न मांडले आहेत. हे कामगार कच्च्या घरामध्ये व झोपड्यांमध्ये राहत असून या घरांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यांच्या राहत्या घराची पडझड झाल्याने त्यांचे संसार उघडयावर आले असून हे कामगार आपला जीव धोक्यात घालून त्याच पडक्या घरात राहून संसाराचा गाडा चालवत आहेत. शासनाच्या माध्यमातून त्यांना इंदिरा आवास घरकुल योजनेतून घरेही मंजूर झाली असून त्यांच्याकडे घर बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध नसल्याने अनेकांना घरकुल मंजूर असूनही स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध नसल्याने अनेकांना घरकुल मंजूर असूनही जागेअभावी शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित राहवे लागत आहे, याबाबत शेती महामंडळाच्या राज्यातील कामगारांनी निवृत्त व रोजंदार कामगार कामावर असलेले व मयत कामगारांचे वारसदार यांना राहण्यासाठी शेती महामंडळाकडे शिल्लक असलेल्या जमिनीपैकी दोन गुंठे जागा देऊन पंतप्रधान घरकुल योजनेच्या माध्यमातून घर बांधून मिळाली अशी मागणी लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी केली.
खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचे वाटप करण्यात आले त्यावेळी जमीन भोगवाट वर्ग क्रमांक दोन च्या होत्या या दहा वर्षानंतर भोगवाट वर्ग क्रमांक दोनच्या जमिनी चे रूपांतर भोगवट वर्ग एक मध्ये होणे अपेक्षित होते परंतु अद्यापही ते झालेले नाही सरकारने याबाबत तातडीने वर्ग दोन जमिनीचे एक मध्ये रूपांतर करण्याचा आदेश करण्यात यावा, शेती महामंडळातील वाटप करण्यात आलेल्या जमिनीवाटप करण्यात आलेल्या जमिनी ह्या क्षारपडूनाफिक आहेत त्याही बदलून देण्यात याव्या, अशी मागणी लक्षवेधीच्या माध्यमातून केली.
शेतीमहामंडळ कामगार/कर्मचारी यांना त्यांचा शेती महामंडळाकडे थकीत असणारा ४ था व ५ व्या वेतन आयोगाचा फरक देण्यात यावा व ६ वा वेतन आयोग लागू करावा. याचा राज्यात असणाऱ्या १४ न्याय देण्यात यावा. या सर्व मागणीची दखल घेऊन महसूल मंत्री यांनी एकत्रित बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल असे आश्वासित केले.