आय मिरर
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बँक अंतर्गत येणाऱ्या सहकारी सोसायट्या कडून थकबाकीदार कर्जदार शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ओटीएस योजनेचा लाभ मिळावा म्हणून इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकीत गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आलयं. या आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टी ,शेतकरी संघटना , बाळासाहेबांची शिवसेना आणि शेतकरी सुकाण समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निमगांव केतकी शाखेचे शाखा अधिकारी रमेश साळुंखे,विकास अधिकारी नितीन चंदनशिवे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी माजी उपसरपंच तात्यासाहेब वडापुरे, अँड.सचिन राऊत, संपत चांदणे, बाबासाहेब भोंग,सोमनाथ मिसाळ,अशोक मिसाळ, बबन खराडे , दत्ता मिसाळ,मंगेश घाडगे,धनाजी राऊत आदी उपस्थित होते.
करे म्हणाले की,मागील दहा वर्षापासून अनेक शेतकरी थकबाकीदार कर्जदार असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने इतर बँकांप्रमाणे ओटीएस म्हणजेच वन टाइम सेटलमेंट योजनेचा लाभ दिल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. हमीभाव,गारपीट, अतिवृष्टी, कोरोना यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.त्यामुळे पिडीसीसी ने ही योजना तात्काळ कार्यान्वित करणे गरजेचे आहे.याचबरोबर अनेक सहकारी सोसायटी देखील ज्या तोट्यात आहेत त्या देखील यातून फायद्यात येतील व शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढेल.