आय मिरर
इंदापूर शहरातील नागरिकांना चांगल्या सुख सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही नेहमीच आग्रही असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून इंदापूर शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे.शहरात जवळपास सर्व ठिकाणी रस्ते व बंदिस्त गटाराची कामे पूर्णत्वास आली आहेत.त्याच बरोबर शहराचे प्रत्येक चौकात सुशोभीकरण करण्यात आल्यामुळे आपल्या शहराला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.त्यामुळे उरलीसुरली कामे करुन इंदापूर शहराचा चेहरामोहरा राष्ट्रवादीच बदलणार असा विश्वास आ. दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.
रविवारी १५ जानेवारी रोजी इंदापूर शहरातील शाहू नगर भागामध्ये ६० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री आणि इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी भरणे बोलत होते.
भरणे म्हणाले की, आज इंदापूर शहरातील शाहू नगर भागामध्ये ६० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले आहे.या विकासकामांमध्ये प्रभागातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज करणे यांसारख्या कामांचा समावेश आहे. तहसीलदार इमारत, नगरपालिका इमारत,न्यायालयाची नूतन इमारत, आय टी आय अशा सर्व नवीन इमारतींमुळे शहराला एक वेगळे रुप प्राप्त झाले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,नगरसेवक पोपट शिंदे , अनिकेत वाघ ,राजेश शिंदे, श्रीधर बाब्रस,अनिल राऊत ,सौरभ शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
आमदार भरणेंनी वाटले तिळगूळ……
आज संक्रांतीच्या सणानिमित्त महिला भगिनींना तिळगुळाचे वाटप आमदार दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. आमदार भरणे आणि जिल्हाध्यक्ष गाराटकर यांनी तिळगुळ घ्या गोड बोला म्हणत महिला वर्गांचा असणारा मकर संक्रांतीचा सण हा अधिक गोड केला.