आय मिरर
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील अनिल कोंडीराम कचरे आणि बाबासाहेब बिरदेव तरंगे या दोन मल्लांनी माती विभागात सुवर्णपदक व बुलेट गाडी पटकावली आहे.यानंतर गुरुवारी १९ जानेवारी रोजी सरडेवाडी ता.इंदापूर येथे ग्रामस्तांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सरडेवाडीचे सरपंच सिताराम जानकर, कर्मयोगीचे संचालक रवींद्र सरडे,विशाल जगताप,संजय मल्हारी, हनुमंत मोठे,सतिश चव्हाण, वसंत मोरे,ओंकार पानारी, वजीर सय्यद,सागर शिंगाडे,पप्पू जगताप यांसह मित्र परिवार उपस्थित होता.
अनिल कोंडीराम कचरे हा इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावचा रहिवाशी असून गेले अनेक वर्षे तो कुस्ती क्षेत्रात आपला नावलौकिक करीत आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्याने 70 किलो वजन गटात माती विभागात चमकदार कामगिरी करून सुवर्णपदक मिळवलं आहे.यासोबत बुलेट गाडीचा तो मानकरी ठरला आहे.
तर बाबासाहेब बिरदेव तरंगे हा इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी गावचा रहिवाशी असून त्याने देखील नेत्रदीपक यश हासिल केलं असून बाबासाहेब तरंगे याने 92 किलो वजन गटात माती विभागात सुवर्णपदक प्राप्त केलं आणि तो देखील बुलेट दुचाकीचा मानकरी ठरला आहे.
.