आय मिरर
कांदलगाव ग्रामपंचायतीस महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार सन २०२०-२१ या वर्षाकरिता देण्यात आला.एकवीस हजार रूपये,सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
गावात प्रयोगशील शेती,सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन,माझी वसुंधरा उपक्रम, महिलांसाठी शेती शाळा,शेतकरी बचतगट,बायोगॅस प्रकल्प, नवनवीन अवजारांचा वापर,शेतकर्यांना प्रशिक्षण या सर्व बाबींची पडताळणी पुरस्कार देताना करण्यात आली होती.
मध्यंतरी कोविड काळ असल्यामुळे पुरस्काराचे वितरण राहून गेले होते, तेव्हा पंचायत समितीला पुरस्कार प्राप्त होताच पुरस्कार वितरण करत असल्याबाबत माहिती गटविकास अधिकारी परीट यांनी दिली.तसेच कांदलगाव हे उपक्रमशील गाव आहे,या पुरस्काराच्या निमित्ताने पुनःश्च एकदा ग्रामपंचायतीचे अभिनंदन करतो,असे उदगार श्री.परीट यांनी काढले.
सदर पुरस्कार वितरण पंचायत समिती इंदापूर येथे गटविकास अधिकारी तथा प्रशासक श्री. विजयकुमार परीट यांच्या हस्ते करण्यात आले. सदर मिळालेला पुरस्कार हा संपूर्ण गावाचा असून पुरस्कारामुळे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे,असे मत सरपंच रविंद्र पाटील व्यक्त केले.
यापूर्वीही गावाला स्वच्छग्राम सन १८-१९, स्मार्टग्राम २०१९ -२०,आणि आता शरद आदर्श कृषीग्राम सन२०२०-२१असे सलग तीनही वर्षी पुरस्कार मिळाले आहेत,सदर पुरस्कार हा कांदलगावमधील प्रत्येक ग्रामस्थाचा आहे,गावाच्या सहकार्यातूनच हे शक्य झाले आहे असे मत ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी मांडले.