आय मिरर
नीरा नदीवरील इंदापूर तालुक्यातील तावशी आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आसू या दोन गावांना जोडण्या करिता नवीन १७ कोटी रूपयांच्या पूलाला मंजुरी देण्याची मागणी चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली होती.या मागणीची दखल घेत गुरुवारी ०९ मार्च रोजी जाहिर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी तरतूद करण्यात आल्याची माहिती आ.दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
हा नवीन पूल निर्माण झाल्यास शेतकऱ्यांची ऊस वाहतूक, यासह अन्य वाहतूक सुलभ होऊन दळणवळण सोपे होणार आहे. या निर्माणामुळे तावशी,उदमाईवाडी,थोरातवाडी, कुरवली,उध्दट,घोलपवाडी आदी भागासह फलटण तालुक्यातील अनेक गावांचा दळणवळणाचा कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याचे भरणे यांनी सांगितले आहे.