इंदापूर : आय मिरर
माजी मंत्री रामदास कदम यांनी गुहागर येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याच्या निषेधार्थ बुधवारी इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने रामदास कदम यांच्या प्रतिनिधीक पुतळ्यास जोडे मारत त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. इंदापूर शहरातील जुन्या पुणे सोलापूर महामार्गावर संविधान चौकात हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, उपजिल्हा प्रमुख संजय काळे,तालुकाप्रमुख नितीन शिंदे,शहरप्रमुख महादेव सोमवंशी,युवा सेना तालुका युवा अधिकारी सचिन इंगळे,वसंत आरडे आदींसह इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या बेताल विधानाच्या निषेधार्थ राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरातून आंदोलने करण्यात येत आहेत.त्याच पार्श्वभूमीवर पुण्याच्या इंदापूरात रामदास कदमांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करीत त्यांच्या प्रातिनिधीक पुतळ्याचे दहन आले. तर यावेळी रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी देखील करण्यात आली.