बारामतीत अपघात झालेल्या जखमी पोलिस कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Sep 25, 2023 - 15:33
 0  15744
बारामतीत अपघात झालेल्या जखमी पोलिस कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू

आय मिरर

बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलिस हवालदार संदीप जगन्नाथ कदम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच वय ४३ वर्षे असून मुळचे इंदापूर तालुक्यातील लासूर्णे गावचे असणारे कदम सध्या बारामती मध्ये राहत होते.आज सोमवारी दि.२५ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली असून इंदापूरातील लासूर्णे या त्यांच्या मुळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत त्यांनी सेवा बजावली असून सध्या ते यवत पोलिस ठाण्याच्या अंतर्गत पाटस पोलिस चौकीत पोलीस हवालदार पदी कार्यरत होते.

शुक्रवारी २२ स्प्टेंबर रोजी कदम हे व्यायामासाठी जात असताना पाठीमागून आलेल्या तीन चाकी टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली होती. या अपघातात कदम यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते.त्यांच्यावर रुगणालायात उपचार सुरु होते. सुरवारीला त्यांना पुण्यात उपचारकामी दाखल केले त्यानंतर कदम यांना पुन्हा बारामतीला हलविण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow