"देवा इतकं वाईट कुणासोबतच होऊ नये" स्वप्न पूर्ण होण्याआधीच संपलं

आय मिरर
रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात.
असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, जो पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालविण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवत असेल, तर अपघात हे होतातच. अशा वेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. त्यामुळे प्रत्येकानं व्यवस्थित गाडी चालवली पाहिजे. या अपघातात स्वप्न पूर्ण होण्याआधीच संपलं आहे, लग्नाच्या कारचा भयंकर अपघात पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल.
हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.गाडी चालवताना वेगावर मर्यादा ठेवा असा सल्ला वारंवार दिला जातो. कारण वेग जास्त असेल तर गाडीवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता असते. अन् त्यामुळे गंभीर अपघात देखील घडू शकतात. मात्र तरी देखील काही अतिउत्साही लोकं वाऱ्याच्या वेगानं ओव्हरटेक करायला जातात, पण शेवटी त्यांच्यासोबत काय घडतं हे आता तुम्हीच पाहा.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्नाच्या कारचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. दोन्ही गाड्या समोरा-समोर धडकल्यानं हा अपघात झाल्यांचं दिसत आहे. यावेळी एक चूक किती महागात पडू शकते हे दिसत आहे. लग्नाची सजवलेली कार पाहून प्रत्येकाच्या अंगावर काटा येत आहे. त्यामुळे स्पीडमध्ये गाडी चालवणाऱ्यांनो आणि ओव्हर टेक करण्याआधी हा व्हिडीओ एकदा पाहाच.
View this post on Instagram
सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात, ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. somna_thsingh_9118_babloनावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला आहे
What's Your Reaction?






