अंकिता पाटील ठाकरेंनी आ.भरणेंना केलं लक्ष ! जनसंवाद यात्रेतून सुरुय भरणेंनी केलेल्या विकासाची गावोगावी चिरफाड
आय मिरर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाच्या युवा नेत्या व पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या रविवार पासून इंदापूर तालुक्यामध्ये जनसंवाद यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
जनसंवाद यात्रेच्या माध्यामाधून आपले राजकीय विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना अंकिता पाटील ठाकरे यांनी लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे.
अंकिता पाटील यांची जनसंवाद यात्रा गावोगावी दाखल होत असून दत्तात्रय भरणे यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीचा आलेखचं त्या जनतेसमोर मांडत असून इंदापूर तालुक्यात मलिदा गँग निर्माण झाली असून गेल्या 10 वर्षात आमदार दत्तात्रय भरणे यांनी केवळ आणि केवळ स्वतःचे खिसे भरल्याचा आरोप त्या करत आहेत.
एकंदरीत ज्या गावांमध्ये अंकिता पाटील ठाकरे यांची जनसंवाद यात्रा दाखल होत आहे. त्या गावात दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या विकास कामांची चिरफाडच सध्या सुरू आहे.यामुळे आ.भरणे यांना मताधिक्याला फटका बसू शकतो.
व्याहळी येथील भैरवनाथ मंदिरामध्ये नारळ फोडून अंकिता पाटील ठाकरे यांनी या जनसंवाद यात्रेचा रविवारी (दि.13) सकाळी शुभारंभ केला. इंदापूर तालुक्यात गेल्या 10 वर्षांमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधिकडून शिक्षण क्षेत्रात, रोजगार उपलब्ध करुन देणे आदी अनेक क्षेत्रामध्ये विकासाचे कोणतेही काम झालेले नाही. तालुक्यात फक्त मलिदा गँगच्या ठराविक लोकांचाच विकास केला असा आरोप त्यांनी यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी केला.
"मलिदा गॅंग हटाव आणि तालुका बचावो" असा नारा अंकिता पाटील ठाकरे यांनी दिला.हाच नारा आता त्या गावोगावी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने देत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विधिमंडळात पाठविण्याचे आवाहन केले आहे, त्यास जनतेने साथ द्यावी व इंदापूर तालुक्याच्या विकासाची जबाबदारी सोपवावी, असे आवाहन अंकिता पाटील ठाकरे यांकडून केले जात आहे.
या जनसंवाद यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, इंदापूर तालुका महिला अध्यक्षा छाया पडसळकर आदींसह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होताना दिसत आहेत.
What's Your Reaction?