महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार धोक्यात? देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाने खळबळ

Jun 5, 2024 - 15:23
Jun 5, 2024 - 15:24
 0  568
महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार धोक्यात? देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाने खळबळ

आय मिरर

लोकसभेचा निकाल समोर आला आणि सगळी उलटफेर झाली. एक्झिट पोलनुसार एनडीए 400 मतं मिळतील असा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात आता एनडीएला 292 आणि इंडिया आघाडीला 234 मतं मिळाली आहे. या सगळ्यानंतर आता सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या असताना महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे भाजपचे नेते टेन्शनमध्ये जाण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मला सत्तेतून मोकळं करा अशी भाजपच्या वरिष्ठांना विनंती केली आहे. देवेंद्र फडणवीस आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. यामागे नेमकं काय कारण आहे काय रणनिती असेल हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पंडित नेहरू नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मान मोदींना मिळाला महाराष्ट्र मध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही भाजपाची पुन्हा एकदा बैठक आम्ही घेणार आहोत.कांदा,सोयाबीन, कापूस याचा मोठा फटका निवडणूक मध्ये बसला.मविआ ला मिळालेले मतदान वआणि आम्हांला मिळालेले मतदान यात फक्त अर्धा टक्क्यांचा फरक आहे.महाराष्ट्र मध्ये आम्हाला नॅरेटिव्हची लढाई करावी लागली.संविधान बदलण्याचा नरेटिव्ह थांबवण्यासाठी आम्हांला अपयश आलं.मी राज्यातील जनतेचे आभार मानतो.मी भाजपा च्या नेत्यांना विनंती करतो.मला सरकार मधून मोकळ करावंपक्षाचं पूर्णवेळ काम करण्याची संधी मिळावी.महाराष्ट्रातील लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो.मला विधानसभा निवडणूक साठी संपूर्ण राज्याची तयारी करायची आहे. म्हणून मला आताच सरकार मधून मोकळ करा.मी लवकर आमच्या वरीष्ठ नेत्यांना जाऊन भेटणार.भाजपाला जो सेटबँक मिळाला त्याची मी जबाबदारी मी स्वीकारतो.

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला वेळ हवं आहे. मला विधानसभा निवडणुकीसाठी काम करायचं आहे. मला सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती नेतृत्वाला केली असल्याचं फडणवीस म्हणाले. यासंदर्भात आपण लवकरच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं. लोकसभेत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासोबत आणखी काही आमदार बाहेर पडणार का? सरकार कोसळणार की भाजप बाहेरुन पाठिंबा देणार? महायुतीचं सरकार धोक्यात येणार का? अशा एक ना अनेक चर्चा उपस्थित झाल्या आहेत. येत्या काळात अनेक घडामोडी वेगानं घडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow