हातात कोयता घेऊन दहशत पसरवण नडलं ! बारामतीतील तिघांची तर इंदापुरातील एकाची थेट येरवड्यात झाली रवानगी

Jan 3, 2025 - 20:52
 0  4956
हातात कोयता घेऊन दहशत पसरवण नडलं ! बारामतीतील तिघांची तर इंदापुरातील एकाची थेट येरवड्यात झाली रवानगी

आय मिरर

बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची थेट पुण्यातील येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.यश दीपक मोहिते,शुभम उर्फ बाळू काळू जगतापआदित्य राजू मांढरे आणि अनिकेत केशवकुमार नामदास अशी या चौघांची नावे आहेत.

बारामती पोलिसांनी फेसबुक, इंस्टाग्राम तसेच व्हाट्सअप या सोशल मीडियाच्या माध्यमातून शस्त्रे हातात घेऊन स्टेटस ठेवणाऱ्या युवकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता, त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलली असून बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोयता हातात घेऊन मिरवणाऱ्या या आरोपींवर ही कारवाई करण्यात आली आहे.

यातील यश दीपक मोहिते,शुभम उर्फ बाळू काळू जगताप,आदित्य राजू मांढरे हे तिघे बारामती मधील रहिवासी आहेत. तर अनिकेत केशवकुमार नामदास हा इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील रहिवासी आहे. बारामती शहरातील ही पहिलीच कारवाई असून सदरचा प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव हा शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती कार्यालयास पाठवलेला होता.

यापुढे जागरूक नागरिकांनी अशा पद्धतीचे स्टेटस सोशल माध्यमावर ठेवलेल्या इसमांचे स्क्रीन शॉट घेऊन शक्ती नंबरवर (9209394917) किंवा प्रभारी अधिकारी यांना पाठवल्यास त्या आरोपींवर याच पद्धतीची कारवाई करण्यात येईल व बातमीदार यांचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल - असं आवाहन पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांनी केल आहे.

जागरूक पालकांनी/ शिक्षकांनी, तसेच नागरिकांनी शहरातील चौका चौकात टवाळखोरी करणाऱ्या, शाळा महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाडी करणाऱ्या, उघड्यावर मद्य प्राशन करणाऱ्या युवकांची माहिती व फोटो शक्ती नंबरवर पाठवावेत त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असही गणेश बिरादार म्हणाले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow