भयानक...! अवघे पन्नास रुपये ज्यादा होते, त्या 50 वरून दोघात भांडण झालं अन् एकाचा जीव गेला 

Feb 13, 2025 - 15:11
 0  1182
भयानक...! अवघे पन्नास रुपये ज्यादा होते, त्या 50 वरून दोघात भांडण झालं अन् एकाचा जीव गेला 

आय मिरर

बातमी आहे नाशिक मधील पण भल्या भल्यांना विचार करायला भाग पाडणारी. आपल्यापेक्षा आपल्या मित्राला पगारामध्ये पन्नास रुपये ज्यादा आहेत म्हणून मित्राचा राग अनावर झाला. याच मुद्द्यावरून दोघात भांडण झालं. हा वाद इतका निपोपाला गेला एकाने दगड उचलून दुसऱ्याच्या डोक्यात घातला आणि यात एका परप्रांतीय मजुराचा जीव गेला.

शांतीलाल ब्राह्मणे असे हत्या झालेल्या परप्रांतीय मजुराचे नाव असून याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संतोष अहिरे या संशयित आरोपीला अटक केली आहे.

नेमकं काय घडलं ?

नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये बुधवारी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी एका परप्रांतीय इसमाचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आला होता या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. संशयितरित्या मृतदेह आढळून आल्याने पंचवटी पोलिसांनी या घटनेचा कसून तपास केला. पोलिसांना तपासात आर्थिक वादातून डोक्यात दगड घालून हा खून झाल्याचा समोर आलं.

यातील खून झालेला व्यक्ती आणि आरोपी हे दोघे एकाच ठिकाणी काम करत होते. त्यांच्या मैत्रीचं चांगलं नातं होतं.ज्या ठिकाणी हे दोघं काम करत होते त्या ठिकाणी यातल्या एका जनाला 200 रुपये पगार होता तर दुसऱ्याला 150 रुपये पगार होता. या दोघांमध्ये या पगारावरून वाद झाला.

तुला दोनशे रुपये पगार कसा आणि मला 150 रुपये कसा असा प्रश्न विचारात दोघांमध्ये टोकाचे भांडण झालं झटपट झाली.या झटापटीत आवटे पन्नास रुपये ज्यादा असल्याच्या कारणातून आरोपीने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड घातला आणि त्याला ठार केलं. याप्रकरणी एका संशयित आला पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow