मोठी बातमी ! IAS अधिकाऱ्याच्या मुलीची मंत्रालयासमोरील इमारतीच्या 10 मजल्यावरून उडी, घटनास्थळी आढळली सुसाईड नोट

Jun 3, 2024 - 13:19
 0  1944
मोठी बातमी ! IAS अधिकाऱ्याच्या मुलीची मंत्रालयासमोरील इमारतीच्या 10 मजल्यावरून उडी, घटनास्थळी आढळली सुसाईड नोट

आय मिरर

मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीनं आत्महत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मंत्रालयासमोर असलेल्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी घेऊन तीने आपलं आयुष्य संपवलं. लिपी रस्तोगी असं या 26 वर्षीय तरुणीचं नावं आहे. 

लिपी रस्तोगी ही आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांची मुलगी आहे. घटनास्थळी सुसाईड नोट देखील सापडली आहे. तीनं आत्महत्या का केली? याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. आज पाहाटे या तरुणीनं आपलं जीवन संपवलं.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांची मुलगी लिपी रस्तोगीने मंत्रालयासमोर असलेल्या इमारतीच्या 10 मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार ती एलएलबीचं शिक्षण घेत होती.  लिपीचे आईवडील दोघेही आयएएस अधिकारी आहेत. वडील विकास रस्तोगी हे सध्या शिक्षण विभागाचे सचिव आहेत तर आई राधिका रस्तोगी या मुद्रा विभाग सचिव आहेत. घटनास्थळी एक सुसाईड नोट आढळून आली आहे, त्यामध्ये लिपी डिप्रेशनमध्ये असल्याचा उल्लेख आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow