बिग ब्रेकिंग | विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू ,दौंडच्या दापोडीतील घटना

आय मिरर
दौंड तालुक्यातील दापोडी येथे विजेचा धक्का लागल्याने पती-पत्नीसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सात वाजण्याच्या आसपास घडलीय. दरम्यान, केवळ बाहेर गेल्याने मुलगी वैष्णवी या दुर्घटतुन बचावली गेलीय.
सुनील देविदास भालेकर (वय 45 वर्षे), पत्नी आदिका भालेकर (वय 38 वर्षे) व त्यांचा लहान मुलगा परशुराम भालेकर (वय 19 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
सोलापूर जिल्ह्यातुन दौंड तालुक्यातील दापोडी येथे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या भालेराव कुटुंबावर काळाने झडप घातली असून यात सोन्यासारखं कुटुंबच उद्ध्वस्त झालेय.
सुनील यांचे कुटुंब पत्र्याची खोलीत राहत होते. राहत्या घरातील तारेला विद्युत प्रवाह उतरल्याने सुनिल हे अंघोळसाठी जात असताना कपडे टाकायच्या तारेवर टॉवेल टाकत असताना त्यांना विजेचा धक्का बसला. त्यामुळे पत्नी आणि मुलगा वाचवण्यासाठी गेले असता त्यांना ही विजेचा धक्का बसला आणि या तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
मुलगा परशुराम हा केडगाव येथील जवाहरलाल विद्यालयात बारावीत शिकत होता. तर मुलगी वैष्णवी ही बाहेर गेली होती, त्यामुळे सुदैवाने ती या दुर्घटनेतून वाचली गेली. मागील पाच वर्षांपासून हे कुटुंब याठिकाणी उदरनिर्वाह करीत होते.
घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक प्रविण संपागे, महावितरण वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.एकाच कुटुंबीयातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?






