उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा जय पवार होणार राजकारणात सक्रिय ?

आय मिरर
बारामतीत शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शारदा प्रांगण येथे सभा झाली. पण दोन दिवसातच अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी बारामतीतील राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाला भेट दिली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी जय पवार यांचे औक्षण करत शहर कार्यालयात त्यांचे स्वागत केले.
यावेळी मी तुमच्या सगळ्यांचे कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे असे जय पवार म्हणाले, लवकरच जय पवार हे राजकारणात सक्रिय व्हावे अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.तुम्ही दादांशी बोलून घ्या त्यांनी मला सिग्नल दिला की मी लगेच तयार आहे असे देखील जय पवार म्हणाले.यामुळे जय पवार हे राजकारणात सक्रिय होणार हे मात्र नक्की झाले आहे.
What's Your Reaction?






