मंत्री विखे पाटलांना धनगर समाजाच्या बाबतीत एवढा रोष का ? वाचा काय म्हणाले धनगर ऐक्य परिषदेचे अध्यक्ष डाॅ.शशिकांत तरंगे

Sep 8, 2023 - 16:30
 0  1396
मंत्री विखे पाटलांना धनगर समाजाच्या बाबतीत एवढा रोष का ? वाचा काय म्हणाले धनगर ऐक्य परिषदेचे अध्यक्ष डाॅ.शशिकांत तरंगे

आय मिरर

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांवर सोलापूर येथे धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी भंडारा उधळत धनगर समाजाच्या आरक्षणाकरीता घोषणाबाजी केली यावेळी या आंदोलकांना मारहाण करण्यात आली असून आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतलयं. मंत्री महोदयांसमोर हे सर्व घडलं असून मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी अडवलं नाही असं म्हणतं धनगर ऐक्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.शशिकांत तरंगे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा निषेध नोंदवलाय.तरंगे हे शुक्रवारी दि.०८ सप्टेंबर रोजी इंदापूर शासकीय विश्रामगृहातील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

विखे पाटलांना धनगर समाजाच्या बाबतीत एवढा रोज का आहे ? ज्यावेळी धनगर समाजाने अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्या अशी मागणी केली त्यावेळी महाराष्ट्रातून विखे पाटलांचा विरोध या नामांतरणाला झाला. तुम्ही महाराष्ट्र सरकारच नेतृत्व करता राज्य सरकारचा घटक म्हणून धनगर बांधवांनी तुम्हाला निवेदन दिलं या निवेदनाची आपण दखल घेण्याऐवजी या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यासाठी प्रशासनाला प्रवृत्त करणे आणि प्रशासनाने देखील या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करणे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे अशी टीका डॉक्टर तरंगे यांनी केली आहे.

धनगर समाजाच्या भावना आपल्या बाजूने वळवण्यासाठी हा भंडारा म्हणजे हे चांगलं प्रतीक आहे असं मानतो असे म्हणतात. राज्यातील धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की धनगर समाजाने या भ्रष्ट नेत्यांवरती राज्यकर्त्यांवरती भंडारा उधळण्यापेक्षा त्यांच्या तोंडावर शेण गोमूत्र शिंपडलं पाहिजे अशी टीका देखील तरंगे यांनी केली आहे.

धनगर समाज केल्या अनेक वर्षंपासून आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. परंतु राज्यकर्त्यांकडून याचा तमाशा सुरू आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी इंदापूर तालुक्यात धनगर समाजाच्या माध्यमातून मोठे आंदोलन झालं. त्यावेळी अनेक आश्वासन देण्यात आली मात्र अद्याप पर्यंत कोणताही लाभ धनगर समाजापर्यंत पोहोचला नाही. 

रविवारी १० सप्टेंबर २०२३ रोजी राज्यातील धनगर समाजाला एकत्र करून पुणे येथे राज्यव्यापी आंदोलन उभे करण्यासाठी आम्ही बैठक आयोजित केली असून या बैठकीत धनगर समाजाच्या आंदोलनाची नवी दिशा ठरवली जाणार आहे. राज्य सरकारने तातडीने या गोष्टीत लक्ष घालावे.

विरोधी बाकावर असताना अजित पवार यांनी धनगर समाजाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेतली. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची ही भूमिका सकारात्मक होती. महाराष्ट्रातून या तिघांना कोणाचा विरोध नसताना आणि बहुमत असताना हे आरक्षणाच्या बाबतीत खेळवण्याचा प्रयत्न करत आहेत. 2024 मध्ये महाराष्ट्रातील धनगर समाज यांना धडा शिकवेल असा इशाराही तरंगे यांनी दिला आहे.

आपल्या शेजारी असणार गोवा राजाने धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात असा कायदा आणि ठराव संमत केला. केंद्राकडे तो पाठवत गोवा राज्यात धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मेळाव्यात अशी विनंती केली. गोव्यात देखील भाजपाचा सरकार आहे तर महाराष्ट्रात देखील या तिघांना कोणतीही अडचण नाही. आतापर्यंत धनगरांचे खूप शोषण झाले आहे त्यामुळे सरकारने धनगर समाजाच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा १० सप्टेंबर पासून धनगर समाज राज्यात अत्यंत उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशाराही डॉक्टर तरंगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow