मुस्लिम समाजातील किती युवकांना नोकऱ्या लावल्या ; हर्षवर्धन पाटील यांचा आ.भरणेंना सवाल 

Feb 12, 2024 - 18:32
 0  612
मुस्लिम समाजातील किती युवकांना नोकऱ्या लावल्या ; हर्षवर्धन पाटील यांचा आ.भरणेंना सवाल 

आय मिरर(देवा राखुंडे)

इंदापूरचे लोकप्रतिनिधी प्रत्येक भाषणात मी विकास केला अशा वल्गना करत आहेत. तसेच मी मुस्लिम समाजासाठी भरपूर काम केले आहे असे बोलत भावनिक करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे माझा लोकप्रतिनिधींना सवाल आहे की तुम्ही इंदापूर तालुक्यातील मुस्लिम समाजातील किती युवकांना नोकऱ्या लावल्या हे सर्वांसमोर जाहीर करावे, असा सवाल उपस्थित करीत आ.भरणे यांना हर्षवर्धन पाटील यांनी आव्हान दिले आहे.

पाटील पुढे म्हणाले की, विद्यमान लोकप्रतिनिधी हे प्रत्येक भाषणात मी इंदापूर तालुक्यातील या रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला असे सांगतात. त्यांना आता प्रत्येक समाजातील लोकांच्या भावनेशी खेळ खेळल्याशिवाय काहीच जमत नाही. 

हे लोकप्रतिनिधी प्रत्येक भाषणात तुम्ही माझेच आहात. मी मुस्लिम समाजासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे असे सांगत आहेत. त्या आमदाराच्या भुलथापांना मुस्लिम समाज कधीच बळी पडणार नाही. जी व्यक्ती मुस्लिम समाजातील एकाही व्यक्तीला साधी नोकरी लावू शकत नाही ती व्यक्ती या समाजाच्या प्रगतीसाठी काय काम करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. तुम्ही मुस्लिम समाजाला गोड बोलण्याशिवाय दुसरे काही काम केलेले नाही, त्यामुळे तुमच्या भूलथापांना कधीच मुस्लिम समाज बळी पडणार नाही, असा ठाम विश्वास यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow