इंदापुरात शहा ग्लोबल स्कूलमध्ये राष्ट्रीय दंतचिकित्सक दिवस साजरा, मोफत विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी

आय मिरर
लहान मुलांच्या दातांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यांचे दात नाजूक असतात आणि भविष्यात दातांच्या आरोग्यावर त्याचा प्रभाव पडतो. यामुळे लहान वयात त्यांच्या दातांची योग्य काळजी घेतल्यास पुढील काळात चांगले दंत आरोग्य टिकवता येते असे प्रतिपादन बाल दंतरोगतज्ज्ञ डॉ. सुश्मिता शहा यांनी इंदापूर येथील शहा ग्लोबल स्कूल येथे केले.
इंदापूर येथील शहा ग्लोबल स्कूल येथे राष्ट्रीय दंतचिकित्सक दिवसाच्यानिमित्ताने आयोजित शालेय विद्यार्थी मोफत दंत तपासणी शिबिर प्रसंगी डॉ. सुश्मिता शहा बोलत होत्या.
यावेळी संस्थेचे विश्वस्त अंगद शहा, रुचिरा शहा, डॉ. नाहीद शेख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात मुलांचे वजन, उंची, दातांची तपासणी करण्यात आली. कल्याणी यादव यांनी सूत्रसंचालन केले.
What's Your Reaction?






