अज्ञातांनी हल्ला चढवल्यानंतर इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया काय ?

May 24, 2024 - 14:18
 0  3981
अज्ञातांनी हल्ला चढवल्यानंतर इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया काय ?

आय मिरर

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास इंदापूर शहरातील संविधाना चौकात हल्ला केलाय. चौकात तहसीलदारांची गाडी आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रोडने जोरदार हल्ला चढविला. यानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी या हल्ल्यासंदर्भात आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.नेहमीप्रमाणे मी इंदापूर प्रशासकीय भावनाकडे निघालो होतो. संविधान चौकात माझी गाडी आली तेव्हा चार चाकी गाडीतून एक हल्लेखोर उतरला आणि लोखंडी राॅडने त्यांनी थेट माझ्यावर हल्ला चढवला.आमच्या अंगावर मिरचीची पूड उधळणी त्यावेळी माझ्या गाडीत माझा चालक आणि मी होतो.आम्ही आमचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.दरम्यान आणखी दोन ते तीन हल्लेखोर गाडीतून उतरून आले त्यांनी देखील आमच्यावरती हल्ला चढवला आणि ते फरार झाले.यानंतर आपण आता कायदेशीर मार्गाने जाणारा असून पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे श्रीकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow