Big Breaking : छेडछाडीची धमकी देत त्या दोघींनी एकदोन नाही तर अडीच लाख रुपये उखळले,सरडेवाडी टोल वर काय घडलं ?

आय मिरर
छेडछाड केल्याची धमकी देत वाहन चालकाला अडीच लाख रुपयांना लुटणाऱ्या दोघा महिलांना इंदापूर पोलिसांनी सरडेवाडी टोल नाक्यावरून ताब्यात घेतले आहे. छेडछाड केल्याची धमकी देत या महिलांनी एका टेम्पो चालकाकडून अडीच लाख रुपये उकळले होते.
दरम्यान वाहन चालकाने आरडाओरडा केल्याच्या नंतर स्थानिकांच्या मदतीने या महिलांना पकडण्यात आलं. राणी सिकंदर शिंदे आणि स्वाती वसंत शिंदे आशिया महिलांची नावे असून त्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मोरवंची गावच्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा तळेगाव दाभाडे येथील टेम्पो चालक शरताज चाँद सय्यद वेथ हा टेम्पो क्र MH 14KQ 3207 घेऊन तळेगाव दाभाडे येथे निघाला होता. दरम्यान त्याने या महिलांना आपल्या वाहनातून लिफ्ट दिली. सरडेवाडी टोल नाका परिसरात आल्यानंतर या महिलांनी वाहनचालकाला तुझे कडे काय पैसे व किमती सामान असेल ते काढून दे नाहीतर तु आमची छेडछाड केली अशी धमकी दिली. चालकांनो वाहन थांबवल्यानंतर त्या दोन महीलांनी वाहन चालकास धक्का देवुन चैनीच्या कप्यातील अडीच लाख रुपये जबरदस्तीने काढून घेवुन त्या दोघी गाडीतुन उतरुन पळू लागल्या.
या प्रकारानंतर वाहन चालकाने गाडीतुन उत्तरुन चोर चोर असा आरडा ओरडा केला. तेथे लोक जमले व त्यांनी त्या दोन्ही महीलांना पकडले, त्यावेळी एका महीलेच्या काखेत काळ्या रंगाची पर्स अडकवलेली होती. यावेळी गर्दीतुन कोणीतरी पोलीसांना फोन फोन केला आणि पोलीस घटनास्थळी दाखल होताच या महिलांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
संबंधित महिलांना स्टेशनला आलेनंतर महिला पोलीसांनी दोन्ही महीलांची अंगझडती घेतली असता त्यातील रार्णी सिकंदर शिंदे हिचे जवळील काळ्या रंगाची पर्समध्ये तक्रारदार वाहन चालक यांचे दोन लाख पन्नास हजार रुपये मिळुन आले. या दोन्ही आरोपी महिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.
What's Your Reaction?






