आमदार रमेश पाटील यांनी केलं अमित शिताफचं कौतुक

Sep 17, 2023 - 21:45
 0  282
आमदार रमेश पाटील यांनी केलं अमित शिताफचं कौतुक

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील अमित शिताफ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत कर सहायक(Tax Assistant) पदी निवड झाली आहे. या निवडीनंतर कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांनी अमित शिताफ यांचा आज इंदापूर येथे सत्कार करीत पुढील सेवा कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.अमित याने संपादीत केलेल्या यशाचं त्यांनी कौतुक केले.

यावेळी कोळी महासंघ अध्यक्ष मुंबई देवानंद भोईर,कोळी महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हजारे,अँड.नितीन राजगुरू, उदय देशपांडे, सुयोग कापसे,महेश वाघमारे, सागर सलगर,बापू लोंढे,नरेश कांबळे,तुषार हजारे,प्रसाद हजारे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या कर सहायक पदासाठीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.यात सरडेवाडी तालुका इंदापूर येथील अमित किसन शिताफ यांची कर सहायक म्हणून निवड झाली आहे, अमितने अतिशय कष्टातून हे यश मिळवले आहे. या यशामध्ये अमितच्या आई वडील छोटा भाऊ यांचा सिंहाचा वाटआहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow