तर टांगा पलटी केल्याशिवाय समाज राहणार नाही - योगेश केदार
आय मिरर
मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षण लढ्यासाठी बारामती तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी आरक्षण संदर्भात माहिती देण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आलं होते.यावेळी बारामती तालुक्यातील लोणी पाटी येथे जेजुरी - मोरगांव रास्ता रोको करून प्रशासनाला आरक्षण मागणीचे निवेदन देखील देण्यात आले.
शाहु महाराजांनी ज्या पद्धतीने मराठ्यांसाठी पहिले आरक्षण दिले आहे.त्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरानी संवीधान लिहले आहे. समाजासाठी या दोघांचे कार्यही मोठे आहे.यामुळे इतीहासाच्या पानावर यांची नावे आजही कोरली आहेत. इतिहास हा एकदाच घडत असतो आणि हा इतिहास घडवण्याचे कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार करू शकतात.आरक्षणावरून सध्या जातिवाद वाढले आहे.
या दोघांनी ओबीसी व मराठा आरक्षणाचा तिढा मिटवला तर हिंदुत्व मजबूत होईल.बहुजनाचा धागा मजबूत होईल. सर्वांना गुण्या गोविंदाने नांदता येईल. इतिहासाच्या पानावर या दोघांचीही नावे कोरली जातील म्हणून सध्याच्या सरकारने आरक्षणाचा हा तिढा सोडवावा. तसेच सर्व मराठी आमदारांनी याकडे लक्ष पुरविले पाहीजे नाहीतर यांचा टांगा पलटी केल्याशिवाय समाज राहणार नाही.असे प्रतिपादन योगेश केदार सकल मराठा समाज संघटक महाराष्ट्र राज्य यांनी लोणी भापकर पाटी येथे मराठा आरक्षण संदर्भात झालेल्या रास्ता रोको आंदोलन प्रंसंगी केले.
रस्ता रोको साठी शेकडोच्या संख्येने बारामती ग्रामीण भागातील मराठा बांधव उपस्थित राहिले होते.यावेळी नायब तहसीलदार यांना निवेदन देत आंदोलकांनी आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याची मागणी केली.
What's Your Reaction?