आज मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदान ,प्रशासनाचा विरोध कायम ! नक्की काय होणार राज्यभरातून लागलं लक्ष
आय मिरर
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे आज बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा होत आहे. विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालामध्ये ईव्हीएम बाबत शंका घेत. मारकडवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे बॅलेट पेपरवर चाचणी मतदानाची मागणी केली होती. मात्र ही मागणी प्रशासनाने फेटाळली.यानंतर मारकड वाडी गावात जमावबंदी आदेश लागू आहेत. अशातच आमदार उत्तम जानकर आणि मरकड वाडी ग्रामस्थ मतदान प्रक्रियेवर ठाम आहेत.
काय आहे मारकडवाडीचे प्रकरण ?
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मारकडवाडी गावातून भाजप उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाले. हे गाव परंपरागत उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांना मानणारे आहे. जानकर आणि मोहिते पाटील एकत्र असल्याने या गावातून जानकर यांना मताधिक्य मिळणे अपेक्षित होते. असा गावकऱ्यांचा कयास आहे. मात्र भाजपा उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने ईव्हीएम बाबत शंका घेऊन मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तम जानकर आमदार झाले तरीही बॅलेट पेपर साठी आग्रही...
माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून 13 हजार मताने निवडून आले. मात्र उत्तम जानकर यांना अपेक्षेप्रमाणे मताधिक्य मिळाले नाही. राम सातपुते यांनी कडवी झुंज दिली. यानंतर आता जानकर समर्थकांनी मोहिते पाटलांची ताकद असताना मताधिक्य न मिळाल्याने बॅलेट पेपर वरील मतदानाचा निर्णय घेतला. जानकर आमदार झाले तरीही लोकशाहीसाठी ही प्रक्रिया आम्ही राबवत असल्याचे आता जानकर समर्थक सांगतात.
What's Your Reaction?