लोणावळा येथे फिरायला नेतो म्हणून मोखाडात केली होती हत्या ; पोलिसांनी असा केला उलगडा

Mar 21, 2024 - 15:12
 0  1112
लोणावळा येथे फिरायला नेतो म्हणून मोखाडात केली होती हत्या ; पोलिसांनी असा केला उलगडा

आय मिरर

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे बांधकाम मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलेची ठेकेदाराशी जवळीक झाल्यानंतर लग्न करण्याचा तगादा धरून मालमत्तेमध्ये हिस्सा मागितल्याने एका आदिवासी महिलेची हत्या मोखाडा तालुक्यात करण्यात आली होती.

या महिलेचे डोके धडापासून वेगळे केले असताना हातावर गोंदलेले नाव व पायात असणारे जोडवे याच्या आधाराने पालघर पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे.

७ फेब्रुवारी २०२४ रोजी मोखाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत खोडाळा कसारा रस्त्यावरील कोरेगावचे शिवार भागामध्ये वैतरणा नदीवरील पुलाखाली डोके नसलेले मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी जव्हार विभागाचे पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथक तयार करून या गुन्ह्याचा तपास पूर्ण केला आहे. संबंधित दोन आरोपींना पालघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मोखाडा येथे आढळलेल्या मृतदेह हा ३० ते ३५ वयोगटातील असल्याचे तसेच हातावर ममता असे नाव गोंदले गेले असल्याचे आढळून आले होते. पायांमधील जोडवे तसेच पेहराव पाहता ही महिला आदिवासी समाजाची असल्याचा अंदाज बांधण्यात आला. या महिलेची ओळख पटवण्यासाठी नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे, कल्याण, मुंबई तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांशी संपर्क साधण्यात आला. मात्र “ममता” नावाची महिला बेपत्ता असल्याची फिर्याद नोंदवली गेली नसल्याने मृत महिलेची माहिती प्राप्त झाली नव्हती.

मृत महिलेच्या एका नातेवाईकाने या प्रयत्नांना प्रतिसाद देऊन काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आपल्या भाचीचा फोटो व भ्रमणध्वनी क्रमांक पोलिसांना दिला. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी सुनील उर्फ गोविंद यादव (४५) या ठेकेदाराला सोलापूर येथून व महेश रवींद्र बडगुजर (३१) यांना बोराडी, शिरपूर येथून ताब्यात घेतले आहे. आरोपीला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. या हत्येनंतर विशेष कोणतेही पुरावे उपलब्ध नसताना पालघर पोलिसांनी अहोरात्र तपासकार्य राबवून ३० दिवसांच्या अवधीमध्ये या गुन्ह्याचा उलगडा केल्याबद्दल पोलीस अधीक्षक यांनी शोध पथकाच्या अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.

लोणावळा सांगून मोखाड्यात हत्या

शिरपूर तालुक्यात बांधकाम व्यवसायात सेंट्रींगचे काम करणारा सुनील यादव याचे त्यांच्याकडे काम करत असणाऱ्या महिलेसोबत प्रेम संबंध निर्माण झाले. या महिलेने आपल्यासोबत लग्न करण्याचे तसेच मालमत्ता आपल्या नावावर करण्याचा तगादात धरला. त्यानंतर ठेकेदाराने आपल्या मित्राच्या सहाय्याने हत्या करण्याचा कट रचला.लोणावळा येथे फिरायला जायचे आहे असे सांगून या महिलेला पालघर जिल्ह्यातील मोखाडा परिसरात आणण्यात आले. निर्जन ठिकाणाचा अंदाज आल्याने या दोघांनी प्रथम रुमालाने महिलेचा गळा आवळून तिला मारून टाकले व पुरावे हाती लागू नयेत म्हणून धारदार शास्त्राने तिचे डोके चा भाग वेगळा करून धड वैतरणा नदीच्या पुला खाली ढकलून देण्यात आले होते अशी माहिती पालघर पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow