राष्ट्रवादी कुणाची ? निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत नेमकं काय घडलं

Oct 6, 2023 - 20:29
 0  738
राष्ट्रवादी कुणाची ? निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत नेमकं काय घडलं

आय मिरर

राष्ट्रवादी कुणाची वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. पहिल्या सुनावणीत अजित पवार गटानं आपली बाजू मांडली तर शरद पवार गटाकडून अजित गटाच्या युक्तिवादावर प्रतिवाद करण्यात आला. विशेष म्हणजे सुनावणीदरम्यान खुद्द शरद पवार निवडणूक आयोगासमोर उपस्थित होते. या सुनावणीत अजित पवार गटाकडून शरद पवार गटावर धक्कादायक आरोप करण्यात आले.

राष्ट्रवादी कुणाची यावर निवडणूक आयोगामध्ये वादळी सुनावणी झाली....शिवसेनेला ज्या पद्धतीनं संख्याबळाच्या आधारावर चिन्ह दिलं गेलं, त्याचा दाखला अजित पवार गटानं निवडणूक आयोगासमोर दिला. तर अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका, अशी मागणी शरद पवार गटानं केली. सुनावणीत सुरुवातीला अजित पवार गटानं बाजू मांडली, तर त्यामध्ये शरद पवार गटानं प्रतिवाद केले. संख्याबळाच्या आधारावर आम्हालाच चिन्ह देण्यात यावं, असा दावा करत अजित पवार गटानं तब्बल 1 लाख 65 हजार प्रतिज्ञापत्रं सादर केली. 

तर शरद पवारांनीच राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केल्यानं पक्ष शरद पवारांचाच असल्याचा प्रतिवाद शरद पवार गटानं केला. या सुनावणीत या सुनावणीला शरद पवार स्वतः उपस्थित होते. अजून शरद पवार गटाचा युक्तिवाद शिल्लक आहे. त्यासाठी 9 ऑक्टोबरला म्हणजे येत्या सोमवारी 4 वाजता निवडणूक आयोगात पुन्हा सुनावणी होणार आहे. 

निवडणूक आयोगासमोरील युक्तिवाद 

अजित पवार गट : शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, पक्षाच्या घटनेचं पालन व्यवस्थित होत नाही 

शरद पवार गट : पवारांचे निर्णय डावलता येणार नाहीत 

अजित पवार गट : राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा गेला, त्यामुळे आमदारांची संख्या महत्त्वाची 

शरद पवार गट : 9 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी पत्र दिलंय  

अजित पवार गट : आमच्याकडे 53 पैकी 42 विधानसभेचे आमदार 

शरद पवार गट : एक गट बाहेर पडला, मूळ पक्ष आमच्याकडे 

अजित पवार गट : संख्याबळाप्रमाणे पदाधिकारी नियुक्तीचे अधिकार 

शरद पवार गट : 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा आम्हाला पाठिंबा 

अजित पवार गट : मुख्य प्रतोद अनिल पाटील आमच्यासोबत 

शरद पवार गट : प्रतोद अनिल पाटलांची नियुक्ती आमचीच 

अजित पवार गट : केवळ एका पत्राद्वारे पक्षात नियुक्त्या कशा होऊ शकतात? 

शरद पवार गट : शरद पवारांची निवड घटनेला धरुन, त्यामुळे पवारच राष्ट्रीय अध्यक्ष 

अजित पवार गट : शिवसेना प्रकरणात संख्याबळ जास्त त्याला पक्ष, चिन्ह 

शरद पवार गट : अंतिम निर्णयापर्यंत चिन्ह गोठवू नका 

सुनावणीदरम्यान अजित पवार गटानं शरद पवार गटावर टोकाचे आक्षेप नोंदवले. आता राष्ट्रवादी कुणाची या वादावर पुढची सुनावणी आता 9 ऑक्टोबरला होणार आहे. शरद पवार मनमानी कारभार करतात, त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्तीच बेकायदेशीर आहे असे टोकाचे आक्षेप अजित पवार गटानं नोंदवले. अजून शरद पवार गटाचा युक्तिवाद बाकी आहे. त्यामुळे शरद पवार गट तितक्याच त्वेषानं युक्तिवाद करेल यात शंका नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow