नवरात्र उत्सवानिमित्त इंदापुरात आज मंगळवारी डान्स स्पर्धा तर उद्या बुधवारी दांडिया स्पर्धेचे आयोजन..!

Oct 17, 2023 - 20:42
 0  596
नवरात्र उत्सवानिमित्त इंदापुरात आज मंगळवारी डान्स स्पर्धा तर उद्या बुधवारी दांडिया स्पर्धेचे आयोजन..!

आय मिरर

नवरात्र उत्सवानिमित्त व सागर अरगडे मित्र परिवाराच्या वतीने इंदापूरात महिलांसाठी आज डान्स स्पर्धा तर उद्या दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.इंदापूर शहरातील सरस्वती नगर येथे आज सायंकाळी साडेसहा वाजता डान्स स्पर्धा तर उद्या सायंकाळी साडेसहा वाजता दांडिया स्पर्धा होणार आहे.डान्स स्पर्धेसाठी खुला गट,तरअठरा वर्षाखालील मुलींसाठी लहान गट असे गटात या स्पर्धा होणार आहेत.

आज होणाऱ्या डान्स स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास १११११ रु. बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. तर उद्या होणाऱ्या दांडिया स्पर्धेसाठी तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधर उपस्थित राहणार आहेत. यावेळीही विजेत्यांना बक्षीसे दिली जाणार आहेत.

महिलांच्या होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे तसेच स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक युवा नेते सागर अरगडे तसेच सागर अरगडे मित्र परिवाराने केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow