बिग ब्रेकिंग | स्वामी चिंचोली नजीक कार अपघातात तिघांचा मृत्यू ; नवविवाहिता जागीच ठार

Feb 13, 2024 - 13:09
 0  2980
बिग ब्रेकिंग | स्वामी चिंचोली नजीक कार अपघातात तिघांचा मृत्यू ; नवविवाहिता जागीच ठार

आय मिरर(देवा राखुंडे)

पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण नजीक स्वामी चिंचोलीत सेलेरियो कार आणि ट्रकचा भिषण अपघात झाला आहे.या अपघातात एका नवविहितेसह कार मधील तिघांचा मृत्यू झाला आहे.हा अपघात मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी आठच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर स्वामी चिंचोली गावचे हद्दीत घडला आहे.हे सर्व पिंपरी चिंचवड पुणे येथील रहिवासी आहेत.

राधिका अजय मस्के वय 22 वर्षे आणि पाठीमागे बसलेले चालकाचे वडील राजू बाबुराव मस्के आणि बाबासाहेब दत्तात्रय धेंडे वय 55 वर्षे अशी मृतांची नांवे आहेत. तर कार मधील दोघे जखमी आहेत.

महामार्ग पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे बाजू कडून सोलापूर बाजूकडे जाणारी सेलेरियो कार नंबर MH12 LJ 6054 ही ओव्हरटेक करताना पुढे चाललेल्या ट्रक नंबर MH 09 CA 3662 हीस पाठीमागून उजवे बाजूस धडकली. यात सेलेरियो कार मधील चालका शेजारी बसलेली त्याची पत्नी राधिका अजय मस्के वय 22 वर्षे आणि पाठीमागे बसलेले चालकाचे वडील राजू बाबुराव मस्के वय 55 वर्षे हे दोघे जागीच मयत झाले. 

चालक अजय राजू मस्के वय 25 वर्षे पाठीमागे बसलेले त्याचे मावस काका बाबासाहेब दत्तात्रय धेंडे वय 55 वर्षे हे दोघे गंभीर जखमी झाल्याने व चालकाची बहीण काजल राजू मस्के वय 18 वर्षे ही किरकोळ जखमी झाल्याने त्यांना चेतन वाघ यांच्या रुग्णवाहिकेतून ICU हॉस्पिटल भिगवन या ठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आले.उपचारा दरम्यान चालकाचे बाबासाहेब दत्तात्रय धेंडे यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर चालक अजय राजू मस्के आणि काजल राजू मस्के यांवर उपचार सुरु आहेत.

ही घटना समजताचं महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस फौजदार वसंत कदम,संतोष काळे,पो.हवा.उमेश लोणकर,पो.नाईक नितीन वाघ हे घटनास्थळी दाखल झाले होते.पुढील तपास दौंड पोलीस करीत करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow