मोठी बातमी | मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी जरांगेंच्या समर्थनार्थ आज पुरंदर कडकडीत बंद
आय मिरर
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी पुरंदर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज एक दिवसाचा कडकडीत बंद पाळण्यात आलाय.पुरंदर बंदला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून पुरंदर तालुक्यातील अनेक संघटनांनी या बंदला पाठिंबा दर्शवला आहे.सासवड येथील शिवतीर्थावर सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने जमले होते.
मराठा बांधवांकडून एक मराठा लाख मराठा आशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी सासवडचे नायब तहसीलदार माधव जाधव,सासवड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ऋषिकेश धर्माधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले.
What's Your Reaction?