नात्यानंतर आता सणातही फूट ! पवार कुटुंबात कटुता वाढतेय का ?

Nov 1, 2024 - 14:57
Nov 1, 2024 - 14:58
 0  169
नात्यानंतर आता सणातही फूट ! पवार कुटुंबात कटुता वाढतेय का ?

आय मिरर

बारामतीच्या गोविंदबागेतील पवारांचा पाडवा हा सध्या राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय झालाय.पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्यानंतर आता पवारांच्या पाडव्यामध्येही फूट पडलीय. शरद पवारांचा पाडवा गोविंदबागेत तर अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत साजरा होणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडल्यानंतर पवारांची ही दुसरी दिवाळी आहे.दरवर्षी पाडव्याच्या दिवाशी बारामतीतील गोविंदबागेत पवार कुटुंब एकत्र येतं. या कार्यक्रमाला प्रामुख्यानं शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे आलेल्या नागरिकांच्या शुभेच्छा स्विकारतात. यंदाच्या गोविंदबागेतील पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार की नाही? याबाबत साशंकता होती.मात्र आता अजित पवारांनी आपला पाडवा काटेवाडीतील निवासस्थानी स्वतंत्र साजरा करायचं ठरवलयं.

दिवाळीचा पाडवा संपूर्ण पवार कुटुंब बारामतीकरांसोबत साजरा करतं असा आजपर्यंतचा इतिहास आहे.सध्या बारामतीचं राजकारण तापलं असून बातामतीत काका विरुध्द पुतण्या संघर्ष पहायला मिळतोय.अशातचं दादांनी वेगळी भुमिका घेतलीय.मात्र याबद्दल आपल्याला काही माहिती नसल्याचं सुप्रिया सुळेंच म्हणणं आहे.

तर दोन दिवसापूर्वीच अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी दिवाळीच्या पाडव्याला चार-पाच व्यक्ती सोडले तर काही फरक पडणार नाही. प्रचार सुरू आहे त्यामुळे साहेब सुप्रिया सुळे युगेंद्र प्रचारात असतील अजित दादा देखील प्रचारात असतील त्यांचं येणं कमी होईल पण एकदम बंद होणार नाही.असं म्हटलं होतं.

यंदा बारामतीत पवार कुटुंबाचे दोन पाडवे होणार आहेत.याआधी फक्त शरद पवार गोविंद बागेमध्ये पाडवा घ्यायचे परंतु अजित पवार उद्या काटेवाडीमध्ये पाडव्याच्या निमित्ताने नागरिकांना भेटणार आहेत. शरद पवारांचा दिवाळी पाडवा हा गोविंद बागेत होईल तर अजित पवारांचा पाडवा हा काटेवाडीत होणार आहे. बारामतीत यंदा दोन्ही पवारांचा पाडवा वेगळा होणार आहे.त्यामुळे नात्यानंतर आता सणातही फूट पडल्याने पवार कुटुंबात कुटता वाढतेय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow