हेडगेवारांचं नाव घेऊन मतं मिळत नाहीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना खा.सुळेंचा टोला
आय मिरर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होऊन 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्रातील जनतेसाठी खुलं पत्र लिहिलं आहे.यामध्ये त्यांनी शरद पवारांचा नामोल्लेख टाळत यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख केला आहे.यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
यावरुन शरद पवार गटानेही बुधवारी पत्र काढत अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. यावरूही आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला सुनावलं आहे.आसामच्या मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर मला आनंद होतो.आसामचा संपूर्ण भाग ते कंट्रोल करतात. हेमंत बिस्वा सरमा यांना भेटल्यावर मी नेहमी त्यांना थंम्प्स अप करते.मला सगळे म्हणतात तुम्ही त्यांना भेटल्यावर एवढं चिअरअप का करतात ? कारण ते मुळचे काँग्रेसचेच आहेत.आता त्यांनी नॉर्थ इस्ट भाजपासाठी मोठं केलं असलं तरीही ते मुळचे काँग्रेसचे आहेत.त्यांच्याकडे कोणी टॅलेंट नाहीये, म्हणून त्यांना बाहेरून माणसं घ्यावी लागतात.पण आपला विचार तिथे जातोय हे चांगलंच आहे.असं सुप्रिया सुळे म्हटलं आहे.
तर बाकीही हेडगेवार विसरून यशवंतराव चव्हाणांचं नाव घेत आहेत, यातच आपलं यश आहे.यशवंतरावांचं नाव घेणं 25 टक्के लोकांनी सुरू केलंय तर उरलेल्या 75 टक्के लोकांनी सुरू करायचं बाकी आहे. त्यांच्याही हे लक्षात आलंय की हेडगेवारांचं नाव घेऊन मतं मिळत नाहीत.त्यामुळे याही सरकारमध्ये चव्हाणांचा फोटो मोठा होतोय असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.
What's Your Reaction?