ब्रेकिंग || बारामती तालुक्यातील कटफळ येथे शिकाऊ विमान कोसळले, पायलट किरकोळ जखमी

Oct 19, 2023 - 17:56
 0  2142
ब्रेकिंग || बारामती तालुक्यातील कटफळ येथे शिकाऊ विमान कोसळले, पायलट किरकोळ जखमी

आय मिरर

बारामती तालुक्यातील कटफळ येथे शिकाऊ विमान कोसळले आहे.बारामतीतील रेडबर्ड कंपनीचे हे शिकाऊ विमान लँडिंग करताना कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.या अपघातात पायलट शक्ती सिंग हे किरकोळ जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.बारामतीत पायलटला ट्रेनिंग दिले जाते आणि याच दरम्यान विमान लँडिंग करताना साडेचार च्या सुमारास हा अपघात घडला आहे.

तांत्रिक विकास झाल्याने धावपट्टी सोडून या विमानाने अचानक शेजारच्या शेतात लँडिंग केले.या विमानात एक शिकावू पायलट आणि एक प्रशिक्षणार्थी होते. हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना बारामती शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार कामी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत विमानाचं मोठे नुकसान झाले आहे. धावपट्टी सोडून या विमानाला शेजारच्या जागेत लँडिंग करावी लागले त्यामुळे झालेल्या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले.

रेडबर्ड कंपनीचे व्हीटीआरबीसी हे विमान आहे. ती म्हणत अचानक का बिघाड झाला असावा काही घटना घडली असावी याचा आता शोध मेकॅनिक करतील. बारामती शहरात ही पहिलीच घटना नसून अचानक लंडिंग करण्याची ही तिसरी घटना आहे.बारामतीत कार्व्हर एविएशन आणि रेडबर्ड या दोन कंपन्या येतात. देशभरातील अनेक प्रशिक्षणातील प्रशिक्षण दिला जातो मात्र असे अपघात होऊ नये यासाठी याचा काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे.

यापूर्वी ५ फेब्रु २०१९ ला इंदापूर तालुक्यातील रूई इथं शिकाऊ विमान कोसळलं होतं.यात पायलट जखमी झाला होता. विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघड झाल्यामुळे ३५०० फुट उंचीवरून विमान कोसळून शिकाऊ पायलट जखमी झाला होता.

त्यानंतर जुलै २०२२ मध्ये इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे एक शिकाऊ विमान कोसळलं होत. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नव्हती. या विमानात एक महिला पायलट प्रशिक्षण घेत होती.ती जखमी झाली होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow