खेळता खेळता पाण्यात पडली मात्र त्यानंतर जे घडतं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल

Apr 8, 2024 - 16:41
Apr 8, 2024 - 16:44
 0  241
खेळता खेळता पाण्यात पडली मात्र त्यानंतर जे घडतं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल

आय मिरर

लहान मुलं खूप चंचल असतात. अनेकदा ते अतिशय घातक खेळही खेळतात. अशा परिस्थितीत ज्या घरांमध्ये लहान मुलं आहेत त्या घरातील लोकांची जबाबदारी खूप वाढते. कारण मुलं इतकी खोडकर असतात की त्यांना एका जागी बसून ठेवणं खूप अवघड असतं.

काही क्षणासाठी आपलं त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं तरी अनेकदा काहीतरी मोठा उद्योग ते करून ठेवतात. सध्या सोशल मीडियावर दोन मुलांचा असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो प्रत्येक पालकांसाठी धडा आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा आणि मुलगी खेळताना स्विमिंग पूलमध्ये उडी मारत असल्याचं दिसतं. मात्र त्यानंतर जे घडतं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

बऱ्याचदा अशा काही घटना घडतात ज्या कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नसतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Heitor_Toto (@heitor_toto9)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भर दुपारच्या वेळी घराबाहेरील स्विमिंग पूलमध्ये दोन लहान मुले खेळत आहेत. एक लहान मुलगा स्विमिंग पूलमध्ये आधीच खेळताना दिसत आहे तर मुलगी स्विमिंग पूलच्या बाहेर खेळताना दिसत आहे. दरम्यान ही लहान मुलगीही खेळता खेळता घसरगुंडीवरुन थेट पाण्यात जाते. मात्र पाणी खोल असल्यानं ती संपूर्णपणे पाण्याखाली जाते आणि स्वत:ला पाण्याच्या वर कढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी तिला पोहता येत नसल्यानं ती पाण्याखाली बुडताना दिसत आहे. बाजूलाच असलेला चिमुकला हे सगळं पाहत असून त्याला नेमकं काय घडतंय हेच कळत नाहीये. तो थोडावेळ पाहतो आणि त्याला कळत की तिला मदतीची गरज आहे. सुदैवानं चिमुकल्याला पोहता येत असल्यानं तो पाण्यात उडी मारतो आणि मुलीला हात देऊन बाहेर काढतो.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर heitor_toto9 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत याला लाखो लोकांनी लाईक केलं आहे. यासोबतच या व्हिडिओवर अनेकांनी निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एका युडरने मुलीचा बचाव करणाऱ्या मुलाला सुपरहिरो म्हटलं आहे. तर अनेकांनी म्हटलं की तो वेळेवर तिथे गेला नसता तर काहीही घडू शकत होतं.

या चिमुकल्यामुळे मुलीचा जीव धोडक्यात वाचल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. त्यामुळे पालकांनी लहान मुलांना अशा ठिकाणी एकटे ठेवणं जीवावर बेतू शकतं.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow