इंदापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान,मतदान केंद्राकडे पेट्या झाल्या रवाना

Nov 4, 2023 - 16:10
 0  869
इंदापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान,मतदान केंद्राकडे पेट्या झाल्या रवाना

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडत असून बावडा, वकीलवस्ती,काझड, शिंदेवाडी, लाकडी,शेळगांव या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. एकूण ३१ मतदान केंद्र ३१ व पोटनिवडणूकीसाठी ३ अशी ३४ मतदान केंद्र स्थापित करण्यात आली असून आज मतदान केंद्राकडे मतपेट्या रवाना झाल्या आहेत.

या मतदान प्रक्रिया एकूण २०४ अधिकारी कर्मचारी नियुक्त केले असून भिगवण,चांडगांव,कचरवाडी(बावडा), कौठळी, व्याहळी आणि सराफवाडी या ठिकाणी ग्रामपंचायत रिक्त सदस्य पदांसाठी पोट निवडणूका होत आहेत. 

यापैकी चांडगांव कचरवाडी(बा.) आणि कौठळी या ठिकाणच्या निवडणूका होणार आहेत. तर सराफवाडी आणि भिगवण या ठिकाणच्या रिक्त जागा बिनविरोध निवडून आल्या असून व्याहळी गावातून उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने या ठिकाणची जागा रिक्त राहिल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी दिली.

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow