मावशी रात्री 12 ला उठवायची अन्... महानुभाव पंथाची काशी समजल्या जाणाऱ्या अमरावतीत तिच्यासोबत काय घडलं ?

Feb 20, 2025 - 20:58
Feb 20, 2025 - 21:01
 0  2962
मावशी रात्री 12 ला उठवायची अन्... महानुभाव पंथाची काशी समजल्या जाणाऱ्या अमरावतीत तिच्यासोबत काय घडलं ?

आय मिरर

महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महानुभाव पंथाची काशी समजल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील दोन मठातील सेवेकरांनी माणुसकीला लाजवेल, असं कृत्य केलं आहे.

रेंद्रमुनी तळेगावकर या महाराजांच्या मठात सेवेकरी असलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन युतीवर सुरेंद्र मुनी व त्याचा साथीदार बाळकृष्ण देसाई या दोघांनी सातत्याने अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून या युवतीचे लैंगिक शोषण केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, शिरखेड पोलिसांनी पोस्कोचा गुन्हा दाखल करून आरोपी सुरेंद्रमुनी तळेगवावकर, बाळासाहेब देसाई आणि पीडितेच्या मावशीला अटक केली आहे.

पीडीत मुलगी 8 महिन्यांची गरोदर

धक्कादायक गोष्ट म्हणजे म्हणजे पिडीत मुलगी 8 महिन्यांची गरोदर असल्याचं देखील समजतंय. शिरखेड पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. या लैंगिक शोषणात सदर अल्पवयीन युवतीची मावशीने देखील आरोपींना सहकार्य केल्याची बाब समोर आली आहे.

मावशी पीडितेला झोपेतून उठवायची अन्...

अल्पवयीन युवतीला आठ महिन्याची गर्भधारणा झाल्याने हे भिंग फुटलं. पीडित मुलगी ही तिच्या मावशीसोबत मठात राहात होती. पीडित मुलगी ही मठातील इतर मुलींसह, महिलांसोबत झोपली होती. रात्री 12 वाजेच्या सुमारात मावशीने पीडितेला झोपेतून उठवलं. नंतर ती तिला सुरेंद्र तळेगावकर यांच्या खोलीत घेऊन गेली. त्यानंतर सुरेंद्र तळेगावकर याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. तरुणीने विरोध केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.

...असं फुटलं भिंग

पिडितेने याबाबक मावशीला सांगितल्यानंतर कोणालाही काहीही सांगू नको, असं म्हणत मावशीने देखील मठातून बाहेर जाण्यापासून रोखलं. दोन्ही नराधमांनी पीडित मुलीवर वारंवार अत्याचार केले. एक दिवस मुलगी गरोदर असल्याचं समजताच मावशीने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. तेव्हा पिडीत मुलीने डॉक्टरांना आपबिती सांगितली. डॉक्टरांनी तातडीने पोलिसांनी कल्पना दिली अन् मठातील बाबाविरुद्ध पोलिसांनी कडक अॅक्शन घेतली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow