शेतकऱ्यांच्या होणाऱ्या विविध चोऱ्या रोखण्यासाठी दक्षता समितीची गरज : ॲड.करे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आय मिरर
शेतकऱ्यांच्या शेतातील शेती साहित्य, शेतीमाल व जनावरांच्या चोऱ्या रोखण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्हावार विशेष दक्षता समिती स्थापन कराव्यात, अशी मागणी पुणे जिल्हा शेतकरी सुकाणू समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत करे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीचे निवेदन इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याकडे सोमवारी दि.28 एप्रिल रोजी ॲड.श्रीकांत करे, शिवसेना शिंदे गटाचे इंदापूर शहर प्रमुख ॲड.आनंद केकान, ॲड. प्रवीण बारवकर,ॲड. कल्याण घाडगे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
या संदर्भात बोलताना ॲड.श्रीकांत करे म्हणाले की, अलीकडे शेतकऱ्यांच्या विद्युत पंप, केबल, स्टार्टर तसेच जास्त भाव असलेला शेतीमाल आणि शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी चोरीला जाण्याचे प्रमाणात वाढले आहे. मुळात शेतकरी नैसर्गिक संकटे, योग्य बाजारभाव मिळत नसल्याने झाला आहे.अशातच त्याच्या शेतातील चोऱ्या होऊ लागल्याने तो आणखीनच आर्थिक संकटात सापडत आहे.
त्यामुळे या विषयात मुख्यमंत्री यांनी लक्ष घालणं गरजेचे आहे. गृह मंत्रालयाने प्रत्येक जिल्ह्यात एक दक्षता समिती स्थापन करून प्रत्येक महिन्याला जिल्हावार आढावा घ्यावा.जिल्हा पोलिस प्रमुखांना याबाबत बैठक घेण्याचे निर्देश द्यावेत.त्यामुळे चोरीच्या घटनांना काही प्रमाणात चाप लागेल.
What's Your Reaction?






