इंदापूरच्या पळसदेवमध्ये भरदिवसा घरफोडी, 6 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास...

आय मिरर
पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील पळसदेव मधील मत्रेवस्ती येथे भर दिवसा घरफोडीची घटना घडली आहे.या घटनेत अज्ञात चोरट्यांनी तबल सहा लाखांहून अधिक किमतीचा आयोजन लंपास केला आहे.
चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत घरातील कपाट आणि डबे उचकून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह मिळून सहा लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरून नेला आहे इंदापूर पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
पळसदेव येथील मत्रेवस्तीत मारुती वामन खोत यांच्या घरी भरदिववसा ही घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा ६ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
ही घटना सोमवारी (दि. १६) दुपारी दीड ते तीन वाजण्याच्या दरम्यान घडली.
खोत कुटुंबीय शेतात कामासाठी गेले असताना चोरट्यांनी घराच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. त्यांनी कपाटे, पेट्या आणि किचनमधील डब्यांची झडती घेतली.
यात त्यांनी चार तोळे, तीन तोळे व एक तोळ्याचे सोन्याचे गंठण, एक सोनसाखळी, दोन भार चांदीचे जोडवे, सात भार,पैंजण आणि ५० हजार रुपये रोख असा एकूण ६ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
दुपारी तीनच्या सुमारास वडिलांसाठी औषध घेण्यासाठी घराकडे परतलेल्या गणेश खोत याने दरवाजा उघडा आणि घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या पाहिल्या. त्याने तातडीने वडिलांना खबर दिली. नंतर घरात तपासणी केल्यावर दागदागिने व रोकड चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.
What's Your Reaction?






