पायोनियर कडून इंदापूरच्या पिटकेश्वरमध्ये शेतकऱ्याच्या बांधावर महिलादिनी महिलांचा सन्मान
आय मिरर(देवा राखुंडे)
मका पिकाच्या बियाणासह विविध बियाणांमध्ये देशपातळीवर नावाजलेल्या पायोनियर कंपनीकडून जागतिक महिला दिनी इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील पिटकेश्वर मध्ये शेतकऱ्याच्या बांधावर महिलांना शिवार फेरी घडवत शेती क्षेत्राचे अत्याधुनिक ज्ञान देत त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.चूल आणि मूल एवढ्यातच गुंतलेल्या या महिलांना अत्याधुनिक शेतीची कास धरण्यासाठी पायोनियर ने उचललेले हे पाऊल महिलांसाठी महत्त्वाचे मानलं जात असून याचं पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
शुक्रवारी 8 मार्च रोजी फिटकेश्वर येथील प्रगतशील शेतकरी संतोष दशरथ कुदळे यांच्या शेतावर पायोनियर कंपनीकडून जागतिक महिला दिन व मका पीक चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान कंपनीकडून महिलांच्या आरोग्याची ही तपासणी करण्यात आली.महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांचा पायोनियर कडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आदर्श माता पुरस्कार मिळालेल्या आजी लिलावती चांदणे यांचाही प्रशस्तीपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी कंपनीचे अधिकारी पीएसएम ज्योतीराम गोडसे यांनी कंपनी विषयी आणि मका पिकाविषयी या महिलांना सविस्तर अशी माहिती दिली.भारी जमिनीचा बादशहा पी- 3524, या वाणाचे उत्पन्न यावेळी काढून दाखविण्यात आले. एकरी 44 क्विंटल एवढे उत्पन्न या ठिकाणी निघाला असल्याची माहिती दिली.दरम्यान या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य शालिनी भोंग व इंदापूर अर्बन बँकेच्या माजी संचालिका अंजना अभंग यांनी ही उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी सावित्री महिला विकास संघाच्या संस्थापक अध्यक्ष रहिना मुलानी, लिना फडतरे(अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती), अखिल भारतीय समता परिषदेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्ता रासकर,कृषी भूषण पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी वैशाली लाळगे, पिटकेश्वरच्या सरपंच सुनीता भोसले, शुभांगी बरळ,ग्रामसेवक अमोल मिसाळ यांसह कृषी सहाय्यक उपस्थित होत्या. पायोनियर कंपनीच्या वतीने अनिल धापटे आणि प्रज्योत भोसले यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमाचे उपस्थित महिलांनी कौतुक केले.
What's Your Reaction?