Big Breaking सिमेंटचा ट्रक गॅरेजमध्ये घुसला, 3 जणांचा चिरडलं

आय मिरर
सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. सोलापूर हैदराबाद महामार्गावर बलकर ट्रकचं टायर फुटल्यामुळे भीषण अपघात घडला. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
तर ४ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर हैदराबाद महामार्गावर दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सोलापूर वरून हैदराबादच्या दिशेने जात असताना अचानक टायर फुटल्यामुळे रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन सिमेंटचा ट्रक गॅरेजमध्ये घुसला. या अपघातात तीन जण ठार झाले आहे. तीन ते चार जण जखमी झाले आहे.
सिमेंटच्या ट्रकचं टायर फुटल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि रस्त्यावरून उतरून ट्रक हा एका गॅरेजमध्ये घुसला. गॅरेजमध्ये अचानक ट्रक घुसल्यामुळे दोन गाड्या आणि आत काम करणाऱ्या चार ते पाच कामगारांना चिरडलं. हा अपघात इतका भीषण होता की, गॅरेजमध्ये जेव्हा ट्रक घुसला तेव्हा मोठा स्फोट झाला. ट्रकने समोर येईल त्या वाहनांना चिरडलं. यात काही दुचाकीचा चक्काचूर झाला.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. बलकर ट्रक गॅरेजमधून बाजूला काढून जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेचा तपास सोलापूर पोलीस करत आहे.
What's Your Reaction?






