नगरसेवक पोपट शिंदे आयोजित इंदापूर नवरात्री फेस्टिवलचा आज दि.20 ऑक्टोबर शेवटचा दिवस ; होम मिनिस्टर सह असंख्य बक्षिस जिंकण्याची संधी
आय मिरर
इंदापूर करांना यंदाच्या नवरात्री महोत्सवात "नवरात्री महोत्सव फेस्टिवल २०२३"या विशेष कार्यक्रमातून तुफान आनंद लुटण्याची संधी माजी नगरसेवक आणि विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने उपलब्ध करुन दिली आहे. या फेस्टिवलचा आज दि.20 ऑक्टोबर शेवटचा दिवस असून या निमित्त होम मिनिस्टर सह असंख्य बक्षिस जिंकण्याची संधी महिलांसाठी चालून आलीय. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
आजच्या दिवशी झी मराठी, सोनी मराठी, स्टार प्रवाह या वाहिनीवरील कलाकारांसोबत महाराष्ट्रभर निवेदन करणारे सुप्रसिद्ध अभिनेते आकाश फल्ले प्रस्तुत होम मिनिस्टर पर्व नवे हा कार्यक्रम पार पडणार आहे.इंदापूर शहरातील प्रसिद्ध-नामांकित डॉक्टर्स अँण्ड फॅमिली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दांडिया नाईटस् व रॅम्प शो देखील आयोजित करण्यात आला आहे.याचे उद्घाटन इंदापूरचा नगराध्यक्ष अंकिता शहा, लाखेवाडी चा सरपंच चित्रलेखा ढोले आणि कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या संचालिका शोभा भरणे यांच्या हस्ते होणार आहे.
इंदापूरात प्रथमचं सलग चौथ्या वर्षी नवरात्री मोहत्सव फेस्टीवल सिजन - 4 पार पडणार असून यात महिलांसाठी दि.१८,१९ आणि २० आँक्टोंबर रोजी खास कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल गुंडेकर आणि सोएब भाई बागवान यांनी दिली.दि.२० रोजी टेंभुर्णी नाका, सावतामाळी मंदिर परिसरात प्रभाग -७ मध्ये सायंकाळी ०७ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात महिलांना आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने असून महिलांसाठी प्रशस्त बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.डॉ. कविता रुपनवर व डॉ. महेश रुपनवर यांच्या सौजन्याने लकी ड्रॉ ३ भाग्यवान विजेत्यांना गृहोपयोगी वस्तू दिल्या जाणार आहेत.
तर डाॅ.प्रियंका रासकर, डॉ. अमोल रासकर यांकडून प्रथम पारितोषिक पैठणी आणि सोन्याची नथ,डॉ. गीता मगर, डॉ. समीर मगर यांकडून द्वितीय पारितोषिक गरम पाण्याचा गिझर आणि डाॅ. कल्पना खाडे, डॉ. मिलींद खाडे यांकडून तृतीय पारितोषिक टेबल फॅन ही बक्षिसे दिली जाणार आहेत.
रमेश शिंदे, शोएब भैय्या बागवान, राहुल शेठ गुंडेकर यांच्यासह आदित्य बोराटे, महेश ढगे, अजित राऊत, गौरव राऊत, रहिम बागवान, सागर राऊत, अमोल राऊत, सचिन शिंदे, सौरभ शिंदे, सोहल बेपारी, प्रतिक झोळ, अजिंक्य बंगाळे,राजन पवार, प्रसाद चेंदके,शक्ती पलंगे, नेहा कोल्ड्रींक्स ॲण्ड आईस्क्रीम, इंदापूर, गुरुकृपा सांस्कृतिक भवन, इंदापूर महात्मा फुले ग्रुप, इंदापूर, महात्मा फुले दहिहंडी संघ, इंदापूर, नगरसेवक पोपट शिंदे मित्र परिवार इंदापूर इंदापूर नगरपरिषद, इंदापूर, पोलिस स्टेशन, इंदापूर, पत्रकार बंधू इंदापूर, नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते, इंदापूर, घुले मंडप अँण्ड डेकोरेटर्स, नातेपुते, सुत्र संचालक संतोष नरुटे यांच्या विशेष सहकार्य हा कार्यक्रम पार पडणार आहे.
What's Your Reaction?