उजनीतून सोलापूरकरांना पिण्यासाठी आवर्तन सोडलं,दहा दिवसात ६ टीएमसी पाणी सोडणार
आय मिरर
उजनी धरणामधून सोलापूरकरांसाठी पिण्याच्या पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलंय. आज सकाळी नऊ वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 1600 क्युसेक दाबाने विसर्ग सुरू करण्यात आलाय. दुपारनंतर तो वाढवून 6000 क्युसेक इतका केला जाणार आहे. आज पासून पुढील दहा दिवस हे आवर्तन सुरू राहणार असून दहा दिवसात उजनी धरणा मधून 6 टीएमसी इतकं पाणी सोडलं जाणार आहे
सोलापूर शहर महानगरपालिका पंढरपूर सांगोला मंगळवेढा या नगरपरिषदांसह भीमा नदी काठावरील विविध ग्राम पंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या उपसा सिंचन योजनांकरिता हे पाणी सोडण्यात आलेय.
सध्या उजनी धरण हे 103 टक्के क्षमतेने भरलेलं असून उजनी धरणामध्ये 118 टीएमसीच्या आसपास पाणीसाठा आहे. पुढील दहा दिवसात यातून सहा टीएमसी पाणी कमी होणार आहे.म्हणजेच उजनीत जवळपास 112 टीएमसी पाणीसाठा उरणार आहे.मागील वर्षी डिसेंबर महिन्यात आजच्या तारखेला उजनी धरण प्लस 17 टक्के होतं.
म्हणजेच उजनी धरणामध्ये जवळपास 73.14 टीएमसी इतका पाणीसाठा होता त्या तुलनेने यावर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस उजनी धरण हे 100 टक्याहून अधिक आहे.यंदाच्या पावसाळ्यात उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर हे पहिलंच आवर्तन सोलापूरकरांसाठी पिण्यासाठी सोडण्यात आलेय.
मागील वर्षी उजनीची भीषण अवस्था झाली होती. उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्यामुळे उजनी वर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच याची किंमत मोजावी लागली. त्या मानानं डिसेंबर महिन्याच्या अखेरीस यावर्षी उजनी काठोकाठ भरलेली आहे.असं असलं तरी मागील वर्षीचा अनुभव पाहता आतापासूनच उजनीच्या पाण्याची काटेकोरपणे नियोजन करण्याची गरज आहे.ज्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात उजनीवर अवलंबून असलेल्या कोणालाचं पाण्याची भीषण टंचाई जाणवणार नाही.
What's Your Reaction?