महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचा माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाला सन्मान

Nov 29, 2023 - 06:39
Nov 29, 2023 - 06:40
 0  528
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचा माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाला सन्मान

आय मिरर

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचा आज इंदापूर येथील भाग्यश्री निवासस्थानी राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचा सन्मान करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी इंदापूर तालुक्यातील मोठ्या संख्येने कुस्ती क्षेत्रातील मल्ल उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' महाराष्ट्रात कुस्ती क्षेत्राचा मोठा नवलौकिक आहे. कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे, वैभव आहे.या क्षेत्रामध्ये कुस्तीपटू सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरी या स्पर्धेत आपले यश संपादन केले.कुस्ती क्षेत्रातील सिकंदर शेख यांची कामगिरी कौतुकास्पद आहे.इंदापूर तालुक्यात देखील कुस्ती क्षेत्राला मोठे महत्त्व आहे. 2005 यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आपण इंदापूर तालुक्यात आयोजन केले होते.

आम्ही मंत्रिमंडळात असताना शासन अध्यादेश काढला होता की महाराष्ट्र केसरी झाला की त्या कुस्तीपटूला क्लास टू(वर्ग -2) ची नोकरी द्यायची आता क्लासवनची नोकरी दिली जाते. सिकंदर शेख हे मंत्रालयात जाऊन आले आहेत. सरकार आपले आहे आम्ही सहकार्य करू. सिकंदर शेख यांच्याकडून ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. दरवर्षी आपण निराभिमा कारखाना परिसरामध्ये शहाजी केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करतो.

यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे , महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांनी मनोगत व्यक्त केले.महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांनी केलेल्या सत्कारबद्दल आभार व्यक्त केले.गंगावेस तालीमचे वस्ताद विश्वासदादा हारुगले तसेच इंदापूर तालुक्याच्या परिसरातील कुस्ती क्षेत्रातील अनेक मल्ल यावेळी उपस्थित होते.अनेकांनी यावेळी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत सेल्फी घेतली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow