"शेठ"च्या वाढदिवशी इंदापूरात महिलांना एक ना अनेक बक्षिसं जिंकण्याची संधी,पार पडणार "होम मिनिस्टर"
आय मिरर
इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी खास इंदापूर शहरात खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील शहा सांस्कृतिक भवनात सिने अभिनेते संकर्षण कराडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
इंदापूर शहर व परिसरात सामाजिक व शैक्षणिक कामात शहा कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे. इंदापूर शहरात व परिसरात भरत शहा व शहा कुटुंबीयांना मानणारा मोठा वर्ग आहे.
भरत शहा यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या महिलांना खास आकर्षक भेटवस्तू व पारितोषिके देण्यात येणार आहेत.
होम मिनिस्टर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
What's Your Reaction?