"तीन लाख दे अन् बायकोला घेऊन जा" तरुणाला पत्नीच्या बॉयफ्रेंडचा फोन

आय मिरर
फसवून लग्न करणं आणि त्यातून लुटणं असे अनेक प्रकार सध्या पाहायला मिळत आहेत. असाच एक विचित्र पकार कोल्हापुरात घडला असून त्रास देणाऱ्या प्रियकरापासून सुटकेसाठी एका तरुणाशी ओळख वाढवून त्याच्या लग्न केल्यानंतर त्याच तरुणीनं परत प्रियकराच्या नादी लागून पतीला ८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे.
या फसवणुकीच्या घटनेचा अखेर पर्दाफाश झाला आणि प्रकरण पोलिसांत पोहोचलं. पण तत्पूर्वी प्रियकरानं चक्क आपल्या प्रेयसीच्या पतीला फोन करुन बायकोला घेऊन जाण्यासाठी ३ लाख रुपयांची मागणी केल्याचं समोर आलं आहे.
नेमका प्रकार काय?
कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी या गावातील ग्रामपंचायत सदस्य म्हणून लखन बेनाडे गेली दोन वर्षे काम करत आहे. 2023 साली लखन बेनाडे याची ओळख लक्ष्मी लोंढे या महिलेसोबत झाली होती. मात्र लक्ष्मी लोंढे हीचं विशाल गस्ते या व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध होते.
दरम्यान विशाल आणि लक्ष्मी या दोघांमध्ये भांडण झाल्यामुळं लक्ष्मीनं विशालच्या जाचापासून आपली सोडवणूक व्हावी यासाठी लखन बेनाडे यांच्यासोबत संपर्क वाढवला आणि त्याच्यासोबत 2024 मध्ये लग्नही केलं.
पण लग्न होताच लक्ष्मीनं पुन्हा विशाल गस्तेच्या संपर्कात आली आणि त्याच्या मदतीनं तिनं आपला पती लखन बेनाडे याच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. नातेवाईकांचं निमित्त करून लक्ष्मीनं लखनकडून 8 लाखांहून अधिकची रक्कम हडप केली.
लखन बेनाडे यांच्याकडील सर्व पैसे संपलेले आहेत हे लक्षात येताच लक्ष्मीनं सर्व दागिने आणि रोख रक्कम घेऊन लखनला सोडून विशाल गस्ते सोबत पळून गेली.
पतीनं सांगितली आपबिती
"तुला जर तुझी पत्नी पुन्हा हवी असेल तर तीन लाख रुपये रोख दे" अशी धमकी चक्क लक्ष्मी बेनाडे हिच्या प्रियकराने लखन बिनाडेला दिली आहे. लक्ष्मी प्रियकरासोबत पुन्हा पळून जाऊन तिने आपली फसवणूक केल्याचं लक्षात येताच लखन बेनाडे यांने कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत शाहूपुरी पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे.
What's Your Reaction?






