माळेगाववर दादाचं ! 21 पैकी तावरे गटाला केवळ एक जागा, साहेबांच्या पॅनलने खातही उघडलं नाही

आय मिरर
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री निळकंठेश्वर पॅनलची एक हाती सत्ता आली आहे. माळेगाव कारखान्याच्या निकालात श्री निळकंठेश्वर पॅनलला 20 जागा मिळाल्या तर माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वातील सहकार बचाव शेतकरी पॅनलला केवळ एक जागा मिळाली. सांगवी गटातून स्वतः चंद्रराव तावरे हे विजयी झाले आहेत. तर शरद पवार गटाला या निवडणुकीत खातही उघडता आलं नाही.
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान पार पडले यात अ वर्गातून 17296 तर ब वर्ग मतदारसंघातून 102 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
24 जून रोजी याच्या मतमोजणीला सुरुवात झाली जवळपास 35 तास हि मत मोजणी ची प्रक्रिया चालली. सर्वप्रथम ब वर्ग मतदार संघाची मोजणी पार पडली यात 91 मते मिळवत उपमुख्यमंत्री अजित पवार विजय झाले तर तावरे गटाच्या उमेदवाराला केवळ दहा मते मिळाली.
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान पार पडले यात अ वर्गातून 17296 तर ब वर्ग मतदारसंघातून 102 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर मंगळवारी 24 जून रोजी याची मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती ही मतमोजणी जवळपास 36 तास चालली.
मंगळवारी सर्वप्रथम ब वर्ग मतदारसंघाची मतमोजणी पार पडली आणि यात उपमुख्यमंत्री अजित पवार 91 मते मिळवत विजयी झाले. तर अजित पवार यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या तावरे गटाला केवळ दहा मते मिळाली.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत एकूण चार पॅनल मैदानात होते. यात शरद पवार यांच्या नेतृत्वातील बळीराजा सहकार बचाव पॅनल ही मैदानात उतरवण्यात आलं होतं. पवार गटाच्या पॅनलच्या माध्यमातून वीस उमेदवार देण्यात आले होते मात्र अजित पवार यांना प्रतिस्पर्धी उमेदवार देण्यात आला नव्हता. दुसरीकडे युगेंद्र पवार वगळता पवार गटातील बडे नेते अर्थात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या तितक्याशा प्रचारात सक्रिय दिसल्या नाहीत.
त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री निळकंठेश्वर पॅनल चा विजय सुखर व्हावा आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील पॅनलला न पडणारी मते विरोधकांना जाऊ नयेत यासाठीच पवार गटाने स्वतंत्र पॅनल उभा केलं होतं की प्रश्न निर्माण झाला आहे.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला काही जागा दिल्या जातील असे चित्र होतं,मात्र 13 जून रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वातील श्री निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली.यात पवार गटाला एकही जागा देण्यात आली नाही. त्यानंतर त्याच दिवशी शरद पवार गटाच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलचे उमेदवार घोषित करण्यात आले.
ज्या ताकतीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवली प्रचार सभा घेतल्या त्या प्रमाणात पवार गटाचे बळीराजा सहकार बचाव पॅनल तितकं सक्रिय नव्हतं. माळेगाव कारखान्याची निवडणूक जिंकण्यासाठी पवार गटाच्या पॅनलच्या शुभारंभ आणि सांगता सभा वगळता मोठ्या जाहीर सभा ही पार पडल्या नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत केवळ विरोधकाला जाणारी मते पवार गटाच्या तागड्यात पडण्यासाठीच हे पॅनल उभा केलं होतं की काय अशा चर्चेला वाव मिळत आहे.
दुसरीकडे अजित पवारांच्या पॅनलचे विरोधात कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी सहकार बचाव शेतकरी पॅनल उतरवलं होतं. या माध्यमातून चंद्रराव तावरे यांनी 21 उमेदवार दिले होते. या निवडणुकीच्या प्रचारात सातत्याने अजित पवारांकडून चंद्रराव तावरे यांच्या वयाचा मुद्दा करण्यात आला. मी माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी ज्या पद्धतीने राजकीय ताकद वापरू शकतो तेवढी ताकद पुढच्या गटाची नाही हेही अजित पवार यांनी सभासदांना समजावून सांगितलं मात्र अजित पवार कुठेही शरद पवार गटावरती जाहीरपणे टीका करताना दिसून आले नाहीत.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत जरी चार पॅनल असले तरी देखील यातल्या तीन पॅनल मध्येच प्रमुख लढत होती. अजित पवार यांच्या नेतृत्वातील पॅनल आपली सत्ता ठेवणार का ? की तावरे गट यांच्या नेतृत्वातील सहकार बचाव पॅनल सत्ता खेचून आणणार ? असा प्रश्न असताना शरद पवार गटाकडून देण्यात आलेलं बळीराजा सहकार बचाव पॅनल चा या निवडणुकीत किती प्रभाव दिसेल असाही प्रश्न होता. जरी या निवडणुकीत शरद पवार गटाचा पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरी तावरे गटाच्या नेतृत्वातील सहकार बचाव शेतकरी पॅनलला जाणारी मते खेचून घेण्याचं काम केलं आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं होतं. यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री निळकंठेश्वर पॅनल ला 20 जागा मिळाल्या तर शरद पवार गटाच्या पॅनलला एकही जागा मिळाली नाही. माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे वगळता सहकार बचाव शेतकरी पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा बारामतीत पवारांची ताकद दिसून आली आहे.
निवडून आलेल्या संचालकांची नावे आणि मते
- अजित पवार यांना मिळालेली मते (श्री निळकंठेश्वर पॅनल) 91
- रतनकुमार साहेबराव भोसले(श्री निळकंठेश्वर पॅनल) 8670
- नितीन वामनराव शेंडे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8494 मते
- विलास ऋषिकांत देवकाते(श्री निळकंठेश्वर पॅनल) 8792
- संगीता बाळासाहेब कोकरे(श्री निळकंठेश्वर पॅनल) 8440
- ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले(श्री निळकंठेश्वर पॅनल) 7576
- शिवराज जाधवराव (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8612
- बाळासाहेब तावरे (श्री निळकंठेश्वर पॅनल)7942
- राजेंद्र बुरुंगले ( श्री निळकंठेश्वर पॅनल) 8116
- तानाजी कोकरे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8495
- योगेश जगताप (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8635
- स्वप्नील जगताप (श्री निळकंठेश्वर पॅनल) 7933
- गणपत खलाटे (श्री निळकंठेश्वर पॅनल)8543
- विजय तावरे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 7882
- प्रताप आटोळे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8328
- सतीश फाळके (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8404
- अविनाश देवकाते (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8640
- जयपाल देवकाते (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8051
- नितीन सातव (श्री निळकंठेश्वर पॅनल) 7858
- देविदास गावडे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8028
तर सहकार बचाव शेतकरी पॅनलचे चंद्रराव तावरे हे 8163 मते मिळवत सांगवी गटातून विजयी झाले आहेत.
What's Your Reaction?






