इंदापूरात शिवशंभो प्रतिष्ठान कडून भव्य दांडीया महोत्सव

आय मिरर
इंदापूरात शिवशंभो प्रतिष्ठान कडून भव्य दांडीया महोत्सव घेण्यात आलाय. यात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. या महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष होते.
प्रत्येक वर्षी दांडीया महोत्सवाला प्रतिसाद वाढत आहे.तसेच या दांडीया महोत्सवाची क्रेज पण वाढत आहे.या नवरात्र दांडीया महोत्सवाची सुरुवात देवीच्या प्रतिमेला हार घालुन व दीप प्रज्वलन करुन करण्यात आली.
यावेळी सौ.अंकिता मुकुंद शहा,मा.नगराध्यक्षा इंदापूर नगरपरिषद व इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
दांडीया महोत्सवासाठी बेस्ट किद्स,बेस्ट सोलो,बेस्ट ग्रुप,बेस्ट काॅस्ट्यूम,आणि लकी ड्रॉ अशी बक्षिसे देण्यात आली.हा दांडीया महोत्सव प्रतिष्ठानचे मार्गदर्शक पोपट पवार यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आला.तसेच प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी कठिण परिश्रम घेतले. शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष शुभम पोपट पवार यांनी आभार मानले.
What's Your Reaction?






