आज पासून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ; इंदापूर मधून पंधरा केंद्रावरती 6019 परीक्षार्थी

Feb 11, 2025 - 09:04
 0  255
आज पासून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ; इंदापूर मधून पंधरा केंद्रावरती 6019 परीक्षार्थी

आय मिरर

बारावीच्या परीक्षांना आज पासून सुरुवात होत आहे. आज मंगळवार 11 फेब्रुवारीपासून ते 18 मार्च पर्यंत या परीक्षा चालणार आहेत.राज्यभरातून 15 लाख 5 हजार 37 परीक्षार्थी ही बारावीची परीक्षा देणार आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रात सांगली सातारा कोल्हापूर पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमधून तब्बल 365 हजार 9994 परीक्षा आरती ही परीक्षा देतील. 

पुण्याच्या इंदापूर मधून 15 केंद्रावरती एकूण 6019 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून या सर्व केंद्रांवरती कॅमेऱ्याची नजर असणार आहे. तरसो पोलीस बंदोबस्त देखील त्यांना आता असणार आहे. जे कोणी कॉफी पुरवण्याचा प्रयत्न करतील अशांवरती प्रशासनाकडून दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

राज्यभरातून 8 लाख 10 हजार 348 मुले, तर 6 लाख 94 हजार 652 मुली आणि 37 ट्रान्सजेंडर परीक्षा देणार आहेत. पुणे नगर आणि सोलापूर विभाग : विद्यार्थी संख्या 2 लाख 47 हजार 762 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 50 हजार 826, असे सुमारे 1 लाख 18 हजार 232 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

यंदाच्या वर्षी बारावीची परीक्षा 10 दिवस अगोदर होत आहे. ही परीक्षा लवकर घेतल्याने निकाल लवकर लागेल. 15 मे पर्यंत बारावी आणि दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे

गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथकांची नेमणूक 

परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी 271 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून संवेदनशील परीक्षा केंद्रावर या भरारी पथकांशी नजर असणार आहे.पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून पुणे जिल्हयात 125 तर कोल्हापूर मधील 39 परीक्षा केंद्रांवर मंडळाचे विशेष लक्ष असणार आहे. या खेरीज या ठिकाणी पोलिसांना तैनात असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रणाली यासोबत ड्रोन कॅमेराचा देखील वॉच असणार आहे. जे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करतील कॉफी पुरवण्याचा प्रयत्न करतील अशांवर प्रशासनाकडून दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

आजारी किंवा अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा असणार आहे. जे विद्यार्थी वैद्यकीय, व्यापारिक किंवा तत्सम कारणांमुळे नियोजित तोंडी, प्रकल्प किंवा अन्य परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी 12, 15 आणि 17 मार्च रोजी ‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षा आयोजित केली जाईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow