काय काय जण जेलमध्ये बसले फॉर्म भरले अन् आमदार झाले : अजित पवार
आय मिरर
विरोधक सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत की राज्याचा उपमुख्यमंत्री असताना अजित पवार कारखानाचा चेअरमन व्हायला का निघालाय. कारखान्याची जवळपास 19750 मतदार आहेत. सव्वा लाख लोकांचा हा प्रपंच आहे.ही लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेबांनी घालून दिलेल्या घटनेप्रमाणे जीवात जीव आहे तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता काय काय जण जेलमध्ये जाऊन बसले फॉर्म भरले आणि आमदारकीला निवडून आले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
खरंतर वय झालेल्या माणसाने थांबायचं असतं तुम्ही 85 वर्षाची झाला तरी थांबायला तयार नाही तुम्हाला शरीर साथ देत नाही,वयोमानाप्रमाणे शरीर थकत असतं.ही जगाची रीत आहे.वडीलधाऱ्यांचा आपण आदर केला पाहिजे. पण वडीलधाऱ्यांनी पण पुढच्या हातामध्ये कारभार दिला पाहिजे ना ? असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी चंद्रराव तावरे यांना टोला लगावला आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ अजित पवार यांनी फलटण तालुक्यातील सांगवी येथे जाहीर सभा घेतली, जाहीर सभेत अजित पवार बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले,कारखान्याचा एक रुपया देखील वायफाय खर्च होऊ दिला जाणार नाही.मागच्या निवडणुकीत आमचे 17 निवडून आले विरोधकांचे पाच आले. काय काय जण पाच पाच वर्षे कारखान्याची पायरी देखील चढले नाहीत. त्यावेळी तुमचं वय 80 होतं तुम्हाला कारखान्याबद्दल एवढी आस्था होती पण तुम्ही एकदाही कळालं नाहीत. तुम्ही घरी बसलात.
1955 सलित माळेगाव कारखाना उभा करण्याचा निर्णय घेतला आता 70 वर्षे झाली. काळ वेळ कोणासाठी थांबत नसते आपल्याला पुढे जायचं असतं. आई बापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर काळाचे नियतीच्या पुढे एकालाही थांबायचं नाही जायचं आहे. असं अजित पवार यांनी म्हटलं.
कालच मी मावळ तालुक्यात अपघात स्थळी पाहणी करायला गेलो होतो.मी अतिशय संवेदनशील माणूस आहे घटना घडली त्यादिवशी बारामतीत होतो पण ताबडतोब सुनील शेळके घटनास्थळी पोहोचले.प्रशासकीय अधिकाऱ्यांना तिथे जायला सांगितलं. मलाही तिथे जाता आलं असतं पण ज्यावेळी अनेक लोक पाण्यात पडतात त्यांचा जीव वाचवणं महत्त्वाचं असतं, आम्ही तिथे गेलो तर त्या ठिकाणची सर्व यंत्रणा आमच्या बंदोबस्ताला लागते. जे पाण्यात असतात त्यांचा जीव वाचवायचा असतो त्याला दवाखान्यात न्यायच असतं.मृत्यू झाले त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे जखमीचा खर्च आपण करत आहोत.
आठ लाख रुपये नवीन पुलासाठी दिलेले होते वर्क ऑर्डर झालेली आहे.काल काहींनी सांगितले साडेसात मीटर रुंदीचा नवीन पूल करत असताना दोन्ही बाजूने फुटपाथ करा.काल ठेकेदाराला बोलवून घेतलं त्याला सगळं सांगितलं काल तातडीने चार कोटी रुपये दिले हे सगळं करून घ्या.आपण जी जबाबदारी घेतो त्याचा जबाबदारीचे भान ठेवून लोकप्रतिनिधींनी आम्ही सर्वजण वागत आहोत. असही अजित पवार यांनी म्हटलं.
माळेगांव सहकारी साखर कारखान्याला फलटण तालुक्यातून ही बऱ्यापैकी ऊस येतो. पूर्वीच्यात आणि आताच्यात खूप फरक आहे आता बुद्धिमत्तेला ज्ञानाला महत्त्व आहे. यशवंतराव चव्हाण यांनी जो सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला वाढवला आधुनिक महाराष्ट्र घडवण्याकरता त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या संस्कारावर मी पुढे चाललो आहे.माझ्या सहकारी संस्था मजबूत असल्या पाहिजेत.महाराष्ट्राला आणि माळेगाव कारखान्याच्या सभासदांना दाखवून द्यायचा आहे अजित पवार चेअरमन झाल्यावर कसा पाच वर्ष चढत्या क्रमाने भाव देतो.
प्रशासनावर माझी पकड आहे कुठे हलगर्जी पण आम्ही चालू देणार नाही. बारामतीत माळेगाव परिसरात करोड रुपयाची विकास कामे आपण केली. महाराष्ट्रातील दोनशे कारखान्यांपैकी माळेगाव सोडून सर्वांचे जास्त भाव कोणी दिला आहे का ? जनतेची मागणी असेल त्याप्रमाणे साखरेचा कोटा देशातील साखर कारखान्याचा सोडला जातो. पुढील पाच वर्षाच्या काळात दैदीप्यमान असं काम करून दाखवू असं म्हणत पॅनल तो पॅनल मतदान करा असं आवाहन अजित पवार यांनी सभासदांना केले.
100 वर्षात घडलं नाही ते घडले गेले...
100 वर्षात घडलं नाही ते घडले गेले त्यामुळे अनेकांचे नुकसान झालंय त्याचे पंचनामे चाललेत असं अजित पवार यांनी म्हटलं.पिकांचे पंचनामे चालू आहेत ज्यांची घरे पडली त्यांना घरकुल देण्याचा निर्णय घेतला.आम्ही कामाची माणस आहोत.शेतकरी ही माझी जात आहे आपल्याला दुसरी जात माहिती नाही.
तुम्ही तुमचं काम चोख करा मी माझं काम चोख करेल...
तुम्ही तुमचं काम चोख करा मी माझं काम चोख करेल,मी पहाटे सहा पासून काम करतो तुम्हाला फक्त माळेगांव कारखान्यापुरती मदत होणार नाही त्याही पलीकडे मदत होणार आहे.मी 7 लाख 20 कोटींचा अर्थसंकल्प सादर करत असतो त्यामुळे मला या गोष्टी अवघड नाहीत.
नीरा नदीचं पाणी स्वच्छ करायचं आहे.मागच्या लोकांनी(विरोधी) कारखान्याची रिक्व्हरी 10.61 पर्यंत आणली होती.कोल्हापूर भागात 1 टक्का रिक्व्हरी जास्त आहे.त्यामुळे टनाला 10 ते 15 किलो साखर जास्त निघते.काही जण म्हणतील आमची ही शेवटची निवडणूक आहे कोण काय म्हणेल तुम्ही तुमच्या प्रपंचाच बघा.
इथे निळकंठेश्वर पॅनल चा चेअरमन मी आहे. तसं बाकीच्या तीन विरोधी पॅनलने चेअरमन कोण सांगायला पाहिजे.आपल्या कारखान्याचा पुढील पाच वर्षाचा कारभार कोण मजबुतीने करू शकतो सुज्ञ मतदाराने विचार करा.पश्चिम महाराष्ट्रात उंच भाव देण्याची आपली परंपरा आहे ती परंपरा मी टिकवू.
वीज तयार करायला साडेचार रूपये खर्च येतो पूर्वी साडेसात येत होता.मी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणला माझ्या शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून एक रुपया अनुदान प्रति युनिटला दिलं त्यामुळे सभासदांना प्रति तानाला शंभर रुपये जादा मिळाले.आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करण्याचा आम्ही निर्णय घेतला याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आपलं भलं करून घ्यायचं फायदा करून घ्यायचा की नाही हे तुमच्या पवित्र शिक्क्यामध्ये आहे.
राहिलेल्या दोन-तीन दिवसात अफवा उठतील अफवांवर लक्ष ठेवू नका. काय काय जण एक एक मत मागतील.राज्यात कारखानदारीची काय अवस्था आहे तुम्हाला माहिती आहे ते मी तुम्हाला उघड करून सांगत नाही मला तुमची फसवणूक करायची नाही तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करा.
What's Your Reaction?